प्रलंबित प्रकरणात ३ कोटी ८५ लाखाहून अधिक रक्कम वसूल
रत्नागिरी, दि. 17 : चिपळूण जिल्हा न्यायालय येथे शनिवार १४ मार्च रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. या लोकअदालतीमध्ये जिल्हा न्यायालयातील व तालुका विधी सेवा समितीची एकूण ७४० प्रलंबित प्रकरणे व १ हजार ३१२ वादपूर्व प्रकरणे ठेवण्यात आली होती. ७४० पैकी १०७ प्रकरणे निकाली होवून, दिवाणी व फौजदारी प्रकरणात एकूण 3 कोटी 50 लाख 10 हजार 521 रुपये इतक्या रक्कमेची तडजोड झाली. तसेच वादपूर्व प्रकरणात 50 प्रकरणे निकाली होवून 35 लाख 11 हजार 8 रुपये इतक्या रक्कमेची तडजोड होवून वसुली झाली व पक्षकारांच्या वेळेचा व पैशाचा अपव्यय टळला. चिपळूण जिल्हा न्यायालयाने गेल्या अडीच वर्षात सलग 11 राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये आत्तापर्यंत 24 कोटीहून अधिक रक्कमेची वसुली केल्याची बाब उल्लेखनीय आहे. Lok Adalat at Chiplun District Court

चिपळूण जिल्हा न्यायाधीश डॉ. अनिता नेवसे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध बँका, पतसंस्था, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी, इतर वित्तीय संस्था आणि नुकसान भरपाईचे अर्ज तसेच कौटुंबिक हिंसाचाराची व पोटगीची प्रकरणे ठेवण्यात आली होती. लोकअदालतसाठी न्यायाधीश व वकीलांचे तीन पॅनेल कार्यरत होते. या लोकअदालतीचे कामकाज जिल्हा न्यायालय -१ चिपळूण जिल्हा न्यायाधीश डॉ. अनिता एस. नेवसे, दिवाणी न्यायाधीश के. ए. पोवार, व सह दिवाणी न्यायाधीश वाय. सी. पाटील तसेच पॅनल विधीज्ञ एन. एस. सावंत, एन. जी. लाड व श्रीमती एन. यु. पवार यांनी पाहिले. लोकअदालतमध्ये पक्षकार व वकीलवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. Lok Adalat at Chiplun District Court
लोकअदालतीकरिता चिपळूण वकील संघ, तसेच वकील संघाचे जेष्ठ विधीज्ञ, सरकारी वकील, पोलीस कर्मचारी व न्यायालयीन कर्मचारी यांनी उपस्थित राहून चिपळूण तालुका विधी सेवा समिती यांना सहकार्य केले. त्यासाठी चिपळूण विधी सेवा समिती अध्यक्ष डॉ. अनिता नेवसे यांनी सर्वांचे आभार मानले. Lok Adalat at Chiplun District Court
