मंत्रीमंडळाच्या बैठकीत झाला निर्णय
राज्यात 30 एप्रिल पर्यंत लागू असलेला लॉकडाऊन 15 मे पर्यंत वाढविण्यात आला आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी मंत्रीमंडळाच्या बैठकीनंतर पत्रकारांना दिली. (Maharashtra Government extended Period of Lockdown upto 15th May.)
कोरोना संसर्ग, ब्रेक द चेक आदी विषयांवर निर्णय घेण्यासाठी बुधवारी (ता. 28) मंत्रीमंडळाची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत अनेक मंत्र्यांनी लॉकडाऊन वाढविण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. तर टास्क फोर्स मधील अधिकाऱ्यांनी देखील लॉकडाऊनचे सकारात्मक परिणाम दिसण्यासाठी कालावधी वाढवला पाहिजे असे मत दिले होते. त्यामुळे आजच्या बैठकीत 15 मे 2021 पर्यंत लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 1 मे पासून निर्बंध आणखी कडक होणार की थोडी शिथिलता मिळणार याबाबत आजच्या बैठकीत निर्णय झालेला नाही. त्याबाबतची अधिकृत घोषणा पुढील एक दोन दिवसात होवू शकते.