रत्नागिरी, ता. 06 : शुक्रवार, ८ ऑगस्ट रोजी नारळी पौर्णिमानिमित्त रत्नागिरी जिल्ह्यात स्थानिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी या संदर्भातील आदेश दिले असून ही सुट्टी फक्त महसूल हद्दीतील शासकीय कार्यालयांसाठी लागू असणार आहे. Local holiday declared on the occasion of Narali Purnima

राज्य शासनाने जिल्हाधिकाऱ्यांना वर्षात तीन स्थानिक सुट्ट्या जाहीर करण्याचे अधिकार दिले आहेत. या अधिकाराचा उपयोग करत २०२५ सालासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील तीन स्थानिक सुट्ट्यांचे नियोजन करण्यात आले आहे. या अधीन, दुसरी स्थानिक सुट्टी २ सप्टेंबर रोजी ज्येष्ठा गौरी विसर्जन, तर तिसरी सुट्टी २० ऑक्टोबर रोजी नरक चतुर्दशी (अभ्यंगस्नान) निमित्ताने जाहीर करण्यात आली आहे. या तिन्ही सुट्ट्यांचा उल्लेख ७ मार्च २०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या अधिकृत अधिसूचनेत करण्यात आला आहे. Local holiday declared on the occasion of Narali Purnima
