आनंददायी शनिवार उपक्रमांतर्गत आज जनजागृती
गुहागर, ता. 25 : महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाच्या ‘आनंददायी शनिवार’ उपक्रमांतर्गत शिर मोरेवाडी येथील जिल्हा परिषद शाळा क्रमांक 7 मध्ये आज सकाळी १० वाजता ‘साक्षरता वारी’ आयोजित करण्यात आली होती. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करणे, साक्षरतेचे महत्त्व समाजापर्यंत पोहोचविणे तसेच शिक्षणाबाबत सकारात्मक वातावरण तयार करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. Literacy Procession in Shir Morewadi
या साक्षरता वारीत विद्यार्थी हातात घोषवाक्यांचे फलक घेऊन गावातून फेरी काढण्यात आली. प्रत्येकाने शिक्षणाचा अधिकार आणि वाचनाचे महत्त्व जाणून घ्यावे, हा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आला. गावातील नवसाक्षर, पालक आणि ग्रामस्थांनीही या उपक्रमात सहभागी होऊन शिक्षण चळवळीला बळ द्यावे, असे आवाहन शाळेच्या वतीने करण्यात आले. Literacy Procession in Shir Morewadi
या कार्यक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. गणेश पांडुरंग मोरे, उपाध्यक्ष सौ. आयुषी अरुण मोरे, सदस्य श्री. समीर बाबू मोरे, शाळा व्यवस्थापन समितीचे इतर सदस्य, नवसाक्षर, शाळेचे मुख्याध्यापक श्री. संजय काशिराम पवार, उपशिक्षक श्री. भरत निवृत्ती ढेकळे, अंगणवाडी सेविका सौ. श्रुती सागर काठटे, मदतनीस सायली मोरे, शाळेतील विद्यार्थी, अंगणवाडीतील बालकांसह मोरेवाडीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. Literacy Procession in Shir Morewadi
‘आनंददायी शनिवार’ या उपक्रमातून विद्यार्थ्यांचे शिक्षण अधिक आनंददायी, कृतीशील आणि समाजाभिमुख करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून आयोजित करण्यात आलेली ही साक्षरता वारी शिक्षणाविषयी जनजागृती निर्माण करण्याबरोबरच वाचन संस्कृतीला चालना देणारी ठरणार असल्याचा विश्वास शाळा प्रशासनाने व्यक्त केला आहे. Literacy Procession in Shir Morewadi
