गुहागर, ता. 12 : नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर होऊन काही दिवस झाले. दहा तारखेपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याला सुरुवात झाली. मात्र गेले दोन दिवस एकही उमेदवारी अर्ज दाखल केला गेला नाही. कारण महाविकास आघाडीने आणि महायुतीने अजून आपले उमेदवार जाहीर केले नव्हते त्यामुळे दोन दिवसांमध्ये एकही अर्ज दाखल केला गेला नाही. महाविकास आघाडीने आपली पहिली 12 जणांची यादी आमदार भास्कर जाधव यांनी जाहीर केली. या बारा जणांच्या यादीमध्ये आठ महिलांचा समावेश आहे. List announced for Guhagar Nagar Panchayat

आपली गुहागर नगरपंचायतीच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर करून आम भास्कर रावांनी प्रचाराचे रणशंक फुंकले आहे. उर्वरित नगरसेवक यांची आणि नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांची यादी येत्या दोन दिवसांमध्ये जाहीर करणार आहेत. महाविकास आघाडीने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेलाही सोबत घेतले असून गुहागर नगरपंचायतीसाठी मनसेला दोन जागा सोडण्यात आल्या आहेत. उर्वरित जागेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि आय काँग्रेस यांच्याशी जागा वाटपा संदर्भात चर्चा सुरू असून येत्या दोन दिवसात त्याचाही निर्णय होईल असे आमदार जाधव यांनी सांगितले. List announced for Guhagar Nagar Panchayat
जाहीर झालेल्या पहिल्या बारा जणांच्या जणांच्या यादीमध्ये 1) सतीश शेटे वार्ड क्रमांक- 3 2)रिद्धी घोरपडे वार्ड क्रमांक -4 3) कोमल जांगली वार्ड क्रमांक -5 4) निशा शेटे वॉर्ड क्रमांक -7 5)प्रगती वराडकर वार्ड क्रमांक -8 6) रिया गुहागरकर वार्ड क्रमांक -9 7) वैशाली मालप वार्ड क्रमांक -10 8) रूपा खातू वार्ड क्रमांक -12 9) राज विखारे वार्ड क्रमांक -16 10)रिया मोरे वार्ड क्रमांक -17 अशी बारा उमेदवारांची पहिली यादी महाविकास आघाडिने प्रसिद्ध केली आहे. List announced for Guhagar Nagar Panchayat
