मनिष खरे; कष्टकऱ्यांच्या डोळ्यातील आनंदाने आम्ही समाधानी
गुहागर, ता. 09 : लायन्स क्लब ऑफ गुहागर सिटी तर्फे गुहागर परिसरातील चिरेखाण कामगारांसोबत दिवाळीचा आनंद वाटून घेण्याचा एक अतिशय सुंदर आणि मनाला भावणारा उपक्रम राबविण्यात आला. Lions Club’s Diwali with Chirekhan workers
दिवसरात्र कष्ट करून, धगधगत्या उन्हात आणि अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या चिरेखाण कामगारांच्या आयुष्यात दिवाळीचा आनंद फुलविण्याचा एक छोटासा प्रयत्न क्लबच्या वतीने करण्यात आला. या कामगारांना दिवाळीचा फराळ आणि मिठाई वाटप करून त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्य फुलविण्यात आले. Lions Club’s Diwali with Chirekhan workers
रोजच्या संघर्षमय आणि कष्टमय जीवनात दिवाळीचा हा गोडवा त्यांच्या आयुष्यात आशेचा एक छोटासा दीप उजळवून गेला. सण म्हणजे केवळ स्वतःच्या आनंदाचा उत्सव नसून, आपल्या आनंदात इतरांनाही सहभागी करून घेण्याचे नाव आहे, याची जाणीव या उपक्रमातून झाली. Lions Club’s Diwali with Chirekhan workers
कष्टकऱ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेले समाधान आणि आनंद हेच या उपक्रमाचे खरे फलित!
या उपक्रमासाठी क्लबचे अध्यक्ष ला. मनिष खरे, सचिव ला. सुधाकर कांबळे, चार्टर प्रेसिडेंट ला. श्यामकांत खातू, पास्ट प्रेसिडेंट ला. संतोष वरंडे, ला. राहुल शिंदे, ला. आमिष कदम, ला. शैलेंद्र खातू आणि ला. मंगेश कदम उपस्थित होते. Lions Club’s Diwali with Chirekhan workers
