• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
11 October 2026, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

लायन्स क्लबची सेवाभावी वाटचाल

by Manoj Bavdhankar
September 21, 2026
in Guhagar
111 1
3
Lions Club Service Activities
217
SHARES
621
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गणेशोत्सवात एसटी चालक-वाहकांना खाद्यपदार्थांचे वाटप

गुहागर, ता. 21 : गणेशोत्सवानिमित्त गेल्या पाच वर्षांपासून चाकरमान्यांना घेऊन गुहागरमध्ये येणाऱ्या एसटी बसच्या चालक व वाहकांसाठी लायन्स क्लब ऑफ गुहागर सिटीच्या वतीने खाद्यपदार्थ व अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात येत आहे. यावर्षीही हा सेवाभावी उपक्रम उत्साहात राबविण्यात आला. Lions Club Service Activities

Lions Club Service Activities

गणेशोत्सवासाठी मोठ्या संख्येने चाकरमानी एसटी बसने गुहागरमध्ये दाखल होतात. त्यांच्या सुरक्षित प्रवासाची जबाबदारी पार पाडणाऱ्या चालक व वाहकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने लायन्स क्लबतर्फे त्यांना फूड पॅकेटचे वाटप करण्यात आले. या उपक्रमातून चालक व वाहकांच्या सेवेला सन्मान देण्याबरोबरच गणेशोत्सव काळात त्यांचे मनोबल वाढविण्याचा प्रयत्न करण्यात आला. Lions Club Service Activities

Lions Club Service Activities

यावेळी गुहागर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक, गुहागर एसटी आगाराचे व्यवस्थापक तसेच लायन्स क्लब ऑफ गुहागर सिटीचे अध्यक्ष, सचिव, पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. Lions Club Service Activities

Lions Club Service Activities

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsLions Club Service ActivitiesMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share87SendTweet54
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.