नूतन अध्यक्ष ला.सचिन मुसळे, सचिव ला.शैलेंद्र खातू तर खजिनदार ला.नितीन बेंडल यांची निवड
गुहागर, ता. 05 : लायन्स क्लब ऑफ गुहागर सिटीच्या नूतन कार्यकारीणी मंडळाचा सन २०२५/२६ या वर्षाकरिता पदाधिकारी यांचा शपथविधी आणि पदग्रहण सोहळा शुक्रवारी शांताई रिसॉर्ट पाटपन्हाळे ता. गुहागर येथे पार पडला. नूतन अध्यक्षपदी ला.सचिन मुसळे, सचिवपदी ला.शैलेंद्र खातू यांची तर खजिनदारपदी, ला.नितीन बेंडल यांची निवड करण्यात आली. Lions Club oath ceremony
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते रोपट्याला पाणी घालून करण्यात आली. लायन्स क्लबचे मावळते अध्यक्ष ला.अनिकेत गोळे यांनी प्रास्ताविका मध्ये लायन्स क्लब ऑफ गुहागर सिटीने वर्षभरामध्ये केलेल्या कार्याचा आढावा सादर केला. Lions Club oath ceremony


या कार्यक्रमासाठी इन्स्टॉलिंग ऑफीसर ला. अँड.विजय जमदग्नी,इंडक्शन ऑफिसर पीएमजेएफ ला. श्रीनिवास परांजपे, गुहागरचे तहसीलदार परीक्षित पाटील,रिजन चेअरमन ला. दिलीप जैन,झोन चेअरमन ला. शामकांत खातू,लायन्स क्लब ऑफ गुहागर सिटीचे नूतन अध्यक्ष ला.सचिन मुसळे, सचिव ला.शैलेंद्र खातू, खजिनदार, ला.नितीन बेंडल , माजी अध्यक्ष ला. डॉ. अनिकेत गोळे, सचिव ला. मनीष खरे, खजिनदार ला. माधव ओक, श्री दुर्गादेवी देवस्थानचे अध्यक्ष किरण खरे, श्री व्याडेश्वर देवस्थान अध्यक्ष शार्दुल भावे, गुहागर पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक सचिन सावंत, उद्योजक शाळीग्राम खातू , माजी रिजन चेअरमन ला.नितीन गांधी, झोन चेअरमन ला.जगदीश वाघुदले, रिजन सेक्रेटरी ला.मिलिंद मुद्राळे,चिपळूण क्लब माजी अध्यक्ष ला.तुषार गोखले, चिपळूण लायन्स क्लब अध्यक्ष ला.शिरीष मुळे, चिपळूण क्लब सेक्रेटरी ला.राजू कांबळे,ला.शांतीलाल गांधी, माजी झोन चेअरमन ला.प्रांजल गुंजोटे, चिपळूण गॅलेक्सी क्लब माजी झोन चेअरमन ला.चेतना होणकर, ला.सोनल कारेकर,ला.तेजल पेंढाबकर, ला.तमीज मुल्ला, ला.एकता मुळे, ला.मयुरी काटकर,पत्रकार गणेश किर्वे, मनोज बावधनकर, गणेश धनावडे यांच्यासह सर्व गुहागर, चिपळूण सिटी लायन्स क्लब मेंबर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ला. संतोष वरंडे, प्रा. राधा शिंदे, प्रा. ला.सुधाकर कांबळे यांनी केले. तर आभार ला. शैलेंद्र खातू यांनी केले. Lions Club oath ceremony