असगोलीतील घटना, 17 घरांमधील टी.व्ही. जळाले
गुहागर, ता. 8 : तालुक्यातील असगोली हुंबरवाडीतील शशिकांत कावणकर आणि सुधीर कावणकर यांच्या संयुक्त घरात वीज शिरली. (lightning strikes) त्यामुळे घरामधील वायरींग आणि स्वीचबोर्ड जळून खाक झाले. केबल टी.व्ही.च्या 80 मीटर वायरमधुन ही वीज अन्य घरात जावून सुमारे 17 घरांमधील सेटटॉपबॉक्स आणि टी.व्ही. जळले आहेत. या घटनेत सुदैवाने प्राणहानी झाली नाही. जळलेल्या केबल पायावर उडून सुधीर कावणकर किरकोळ जखमी झाले आहेत.
Lightning Strike Empact : A joint house of Shashikant Kavankar and Sudhir Kavankar in Asgoli Humberwadi in the taluka was electrocuted. As a result, the wiring and switchboard in the house were burnt to ashes. The electricity is transmitted from the 80-meter cable of the cable TV to another house and to the set-top box and TV in about 17 houses. Are burned. Fortunately, no casualties were reported in the incident. Sudhir Kavankar sustained minor injuries after flying over the burnt cable.
गुहागर परिसरात मंगळवारी, (ता. 8) दुपारी 1.30 च्या दरम्यान वीजांच्या कडकडाटासह पाऊस सुरु झाला. त्यावेळी असगोली हुंबरवाडीतील कावणकरांच्या घराशेजारी नारळाच्या बुंधात वीज पडली. या वीजेने नारळमाडा शेजारील दगडी उडाला. तेथून ही वीज घरावर टाकलेल्या छपरांवर उडाली. या छप्पराखाली एक एलईडी दिवा होता. या दिव्याने वीज खेचून घेतली. एलईडी दिवा होल्डरसह फुटला आणि तेथील वायरिंगमधील न्यूट्रल वाहिनीतून ही वीज घरामधील सर्व वायरींग जाळत पुढे सरकत राहीली. स्वयंपाकघर, माजघर, दोन्ही बाजुच्या पडव्यांमधील चार खोल्या असे सर्व ठिकाणचे स्वीचबोर्ड व वायरींग जळले. शेवटच्या खोलीत न्युट्रल वायरचा तुकडा पडल्याने तेथून वीज जमीनीत नाहीशी झाली. जळलेल्या वायरचे काही तुकडे पडून सुधीर कावणकर किरकोळ जखमी झाले आहे. या घटनेत कावणकरांच्या घरातील 35 हजाराचे वायरिंग जळून गेले आहे.
नारळाच्या बुंधात वीज पडताना त्या वीजेचा स्पर्श केबल टी.व्ही.च्या ऑप्टीकल फायबरच्या वाहिनीला झाला. क्षणार्धात ही वीज ऑप्टीकल फायबरच्या वाहिनीतून आजुबाजुच्या घरांपर्यंत पोचली. त्यामुळे जवळपास 17 घरांमधील टी.व्ही. आणि सेटटॉप बॉक्स बंद पडले. लगेचच लाईट गेल्याने आणखी कीती टी.व्ही. नादुरुस्त झाले आहेत ते समजलेले नाही. वीज वहन होत असताना 80 मिटर ऑप्टिकल केबल आणि 4 ॲम्लिफायर ही जळल्याने केबल ऑपरेटरचे 6 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
कावणकरांच्या घरातील नुकसानीचा पंचनामा तलाठी व ग्रामसेवक यांनी केला आहे. अन्य नुकसानीची माहिती प्रशासन घेत आहे.