गुहागर, ता. 23 : तालुका विधी सेवा समिती, गुहागर यांच्या वतीने ग्रामपंचायत मळण येथे एन.डी.पी.एस. कायदा (N.D.P.S. Act) व ज्येष्ठ नागरिक कायदा (Senior Citizens Act) या विषयांवर कायदेविषयक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. Legal Guidance Camp at Malan

या शिबिरात तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा दिवाणी न्यायाधीश व न्यायदंडाधिकारी वर्ग-१, गुहागर श्री. पी. व्ही. कपाडिया यांनी एन.डी.पी.एस. कायद्याविषयी सविस्तर व बहुमोल मार्गदर्शन केले. तसेच ॲड. चिनार आरेकर यांनी ज्येष्ठ नागरिक कायद्यांतर्गत उपलब्ध अधिकार व संरक्षणात्मक तरतुदींविषयी माहिती दिली. Legal Guidance Camp at Malan

या शिबिरास ग्रामपंचायत कार्यालयातील ग्राम महसूल अधिकारी, कर्मचारी वर्ग, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष तसेच गावातील महिला व पुरुष नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमास उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. Legal Guidance Camp at Malan

