अनुश्री पोलाजी, खरे-ढेरे-भोसले महाविद्यालयात व्याख्यान
गुहागर, दि. 07 : आजच्या विद्यार्थ्यांवर चंगळवादी जीवन शैलीचे दुष्परिणाम होत आहेत. मोबाईलच्या अतिवापराचे शरीराच्या विविध भागांवर विपरीत परिणाम होतात. असे प्रतिपादन अनुश्री पोलाजी यांनी केले. खरे-ढेरे-भोसले महाविद्यालयात (Khare-Dhere-Bhosle College), WDC, NSS व हेल्थ केअर समिती यांच्या विद्यमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनमध्ये संतुलित आहार या विषयावर डॉ. स्मिता बळवंत व अनुश्री पोलाजी यांची व्याख्याने झाली. Lecture at Khare-Dhere-Bhosle College


दि. २ ते ३० मार्च या कालावधीत होणाऱ्या स्वयंसंरक्षण, संतुलित आहार योग आणि शारीरिक स्वास्थ्य, प्रमाणपत्र अभ्यासक्रम या कोर्सचेही उद्घाटन करण्यात आले. यावेळी डॉ. स्मिता बळवंत, अनुश्री पोलाजी, प्रशिक्षक सोनाली वरंडे, महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. अनिल सावंत आणि IQAC समन्वयक प्रा. गोविंद सानप उपस्थित होते. Lecture at Khare-Dhere-Bhosle College
कार्यक्रमाचे प्रास्ताविक महिला विकास कक्षाच्या समन्वयक सौ. आडेकर यांनी केले. देशाच्या सर्वांगिण विकासामध्ये महिला महत्वाची भूमिका निभावते. व्रतवैकल्ये, रूढी अंधश्रद्धा, वैद्यकीय सुविधांचा अभाव इत्यादी चिंतेचे विषय आहेत. त्यासाठी आहार विषयक व्याख्यानाचे आयोजन केल्याचे सौ. आडेकर यांनी सांगितले. Lecture at Khare-Dhere-Bhosle College


प्राचार्य डॉ. सावंत यांनी प्रमाणपत्र कोर्स विद्यार्थ्यांसाठी किती महत्वपूर्ण आहे हे स्पष्ट केले. डॉ. सावंत यांनी सांगितले की, कोरोना काळातील निर्माण झालेल्या अस्थिर परिस्थितीने विद्यार्थी गोंधळलेल्या अवस्थेत आहे. त्यांचा आत्मविश्वास कमी झालेला आहे. अशा परिस्थितीत हा कोर्स अत्यंत महत्वपूर्ण ठरणार आहे. त्यासाठी महाविद्यालयातील सर्वच विद्यार्थांनी या कोर्समध्ये सहभागी व्हावे. Lecture at Khare-Dhere-Bhosle College
महाविद्यालयाचे IQAC समन्वयक प्रा.गोविंद सानप यांनी उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. Lecture at Khare-Dhere-Bhosle College
यानंतर प्रमुख व्याख्यात्या डॉ. स्मिता बळवंत यांनी आहार म्हणजे काय ? ते स्पष्ट करून आपल्या शरीरावर, आरोग्यावर होणारा परिणाम विषद केला. संतुलित आहारात असणारे प्रथिने, कार्बोदके फॅटस या घटकांची सविस्तर माहिती दिली. रोजच्या आहारात एखादे तरी फळ खाण्याचा आग्रह धरला. मुलींच्या आहारात कॅलशियमयुक्त पदार्थ असण्याची गरज व्यक्त केली. त्यांनी आपले व्याख्यान पीपीटीद्वारे अत्यंत ओघवत्या स्वरुपात मांडले. Lecture at Khare-Dhere-Bhosle College
अनुश्री पोलाजी यांनी आजच्या विद्यार्थ्यांवर चंगळवादी जीवन शैलीचे दुष्परिणाम कोणत्या प्रकारचे होत आहेत यांची माहिती दिली. यासाठी विद्यार्थ्यांनी कोणती काळजी घ्यावी याबद्दल समुपदेशन केले. मोबाईलवर बोलताना कोणत्या पद्धतीने धरावा, मोबाईलचे शरीराच्या विविध भागांवर होणाऱ्या परिणामांची कल्पना दिली. त्या अनुषंगाने आहार विषयक समुपदेशनही केले. Lecture at Khare-Dhere-Bhosle College
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. पाटील यांनी केले. याप्रसंगी बहुसंख्येने विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. प्रा.अनिल हिरगोंड यांच्या आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली. Lecture at Khare-Dhere-Bhosle College

