• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
8 June 2025, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

गुहागर शहरातील भू संपादन प्रक्रियाच पूर्ण नाही

by Mayuresh Patnakar
April 9, 2021
in Old News
17 1
0
गुहागर चिपळूण महामार्गासाठी 171 कोटी मंजुर गडकरींचे ट्विट
34
SHARES
98
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर विजापूर महामार्ग : संयुक्त मोजणीनंतरचे काम रखडलेले

गुहागर, ता. 9 : विजापुर महामार्गाच्या आरंभ बिंदुपासून गुहागर शहरातील भू संपादनाची प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. मात्र मोडकाआगर पुलावर स्लॅब पडल्यानंतर गुहागर ते मोडकाआगर रस्त्याच्या कामाला सुरवात करण्याचे नियोजन सध्या मनिषा कन्स्ट्रक्शनद्वारे सुरु आहे. त्यामुळे भुसंपादनाबाबत प्रत्यक्ष कार्यवाही कधी सुरु होणार असा प्रश्र्न येथील जागा मालकांना पडला आहे.

Land Acquisition Process is not completed in Guhagar City for Guhagar Vijapur National Highway. Thereafter Contractor is planning to start the work from 0 KM.

गुहागर विजापुर महामार्गाचा आरंभ बिंदु गुहागर शहरातील बाजारपेठ नाका येथे आहे.  बाजारपेठ नाका ते गुहागर बसस्थानकापर्यंतचा मार्ग अरुंद असुन त्याच्या दोन्ही बाजुला गेली अनेक वर्ष दुकाने आहेत. बस स्थानकानंतरच्या मार्गावर काही ठिकाणी स्थानिकांची घरे आहेत. भूमि अभिलेख कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार महामार्गाच्या आरंभ बिंदुपासून ते खरे ढेरे महाविद्यालयापर्यंतच्या परिसरात रस्त्यासाठी नव्या रस्त्याच्या मध्यबिंदुपासून 12 मिटर ते 30 मिटर भुसंपादन केले जाणार आहे. प्रत्यक्षात यापैकी महामार्गासाठी आवश्यक तेवढीच जागा यावेळी घेतली जाणार आहे. ज्या जमीनमालकांच्या जागा जाणार आहेत. त्यांना संयुक्त मोजणीनंतर एक नोटीसही आली आहे. मात्र त्यानंतर कोणतीच कार्यवाही भुसंपादन कार्यालयाकडून झालेली नाही. सर्वसाधारणपणे संयुक्त मोजणीनंतर भुसंपादन अधिकारी एक नोटीस काढुन जमीन मालकांना आपली जागा घेणार असल्याचे सुचित करतात. त्यानंतर प्रत्यक्ष जागेवर येवून शासन आपल्याला लागणारी जागा चिन्हांकित करते. त्याचा आदेश प्रसिध्द करुन त्यावर हरकती मागिविल्या जातात. त्यानंतर अवॉर्ड प्रसिध्द होते. जागा मालकाकडून कागदपत्रांची पूर्तता झाल्यावर शासनाच्या नियमांप्रमाणे जागामालकाला मोबदला देण्याची प्रक्रिया सुरु होते.  मात्र संयुक्त मोजणी नंतर एका सूचनापत्राशिवाय अन्य कोणतीही कार्यवाही भुसंपादन अधिकाऱ्यांकडून आजतागायत झालेली नाही. त्यामुळे प्रत्यक्ष भुसंपादन केव्हा होणार, आम्हाला आमची किती जागा संपादित केली जाणार आहे याची माहिती केव्हा मिळणार. असे अनेक प्रश्र्न रस्त्याशेजारील जागा मालकांना पडले आहेत.

दरम्यान मोडकाआगर येथील पुलावर स्लॅब टाकण्याची तयारी अंतिम टप्प्यात आहे. गुढीपाडव्यापर्यंत मोडकाआगरच्या नव्या पुलाचे काम पूर्ण होणार आहे. या पुलाला दोन्ही बाजुने जोडणाऱ्या रस्त्याचे काम एप्रिल अखेर सुरु होईल. या कामाबरोबरच गुहागरच्या आरंभ बिंदुपासून महामार्गाचे काम सुरु करण्याचे नियोजन ठेकेदार मनिषा कन्स्ट्रक्शनचे अभियंत करत आहेत.

या संदर्भात बोलताना भूमिअभिलेख गुहागरच्या उपअधिक्षक श्रीमती सुप्रिया शिंत्रे म्हणाल्या की, संयुक्त मोजणीचा अहवाल आम्ही भुसंपादन अधिकारी, चिपळूण यांच्याकडे पाठवून दिला आहे. यानंतरची कार्यवाही ही भुसंपादन अधिकारी यांच्यामार्फत होते. त्यामुळे महामार्गाच्या भुसंपादनाबाबतची अधिक माहिती भुसंपादन अधिकारीच देवू शकतात.

Tags: Breaking NewsChiplun RoadGuhagarGuhagar NewsGuhagar Vijapur National HighwayLand acquisitionLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNational HighwayNews in GuhagarNews in MarathiProcessVijapur Highwayगुहागर चिपळूण रोडगुहागर विजापूर राष्ट्रीय महामार्गटॉप न्युजताज्या बातम्याप्रक्रियाब्रेकिंग न्युजभू संपादनमराठी बातम्याराष्ट्रीय महामार्गलेटेस्ट अपटेड्सलोकल न्युजविजापूर महामार्ग
Share14SendTweet9
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.