उपविभागीय अधिकारी लिगाडे, मालकीबाबतचे वाद न्याय व्यवस्था सोडवेल
गुहागर, ता. 31: गुहागर विजापूर महामार्गाचे रामपूरपर्यंतचे भुसंपादनाची कार्यालयीन प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आता भुमी अधिग्रहण प्रक्रिया थांबणार नाही. केवायसीची प्रक्रिया पूर्ण करणाऱ्या जमीन मालकांच्या खात्यात पैसे जमा केले जात आहेत. प्रत्यक्ष महामार्गाचे बांधकाम कधी सुरू होणार हा विषय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणशी संबधित आहे. अशी माहिती उपविभागीय अधिकारी आकाश लिगाडे यांनी दिली. Land acquisition process at Guhagar

कालपासून गुहागरमधील महामार्गासाठी भुमी अधिग्रहणाला सुरवात झाली. तत्पर्वी उपविभागीय अधिकारी लिगाडे यांनी तहसीलदारांसमवेत गुहागरमधील नागरिकांशी संवाद साधला. व्यापाऱ्यांनी दुकाने जेसीबी लावून तोडू नका. आम्ही इमारतींमधील लाकूड सामान व अन्य गोष्टी स्वत: काढू. अशी विनंती केली. त्याला संमती देताना लिगाडे म्हणाले की, वास्तविक मे 2023 चा अल्टिमेटम तत्कालीन उपविभागीय अधिकाऱ्यांनी दिला होता. परंतू भु संपादनाची प्रक्रिया अर्धवट असल्याने आम्ही जमीन अधिग्रहीत केली नाही. आपल्याला सगळ्याना जून 2025 मध्ये 60 दिवसांची अंतिम नोटीस मिळाली होती. ती मुदत संपली तरी आम्ही दुकानांना हात लावला नाही. मात्र आता आणखी मुदतवाढ मिळणार नाही. दुकानांमधील आवश्यक ते सर्व सामान आपण आजपासून उचलण्यास सुरवात करावी. आपले दुकान रिकामे होत असेल तर आम्ही मुद्दाम जेसीबी लावणार नाही. पण आपल्याकडून काहीच हालचाल झाली नाही तर मात्र आम्हाला नाईलाजाने जेसीबीने दुकाने तोडावी लागतील. Land acquisition process at Guhagar

काही ग्रामस्थांनी भाडेकरु व जमिनदारांमध्ये वाद आहेत त्यामुळे मोबदला वितरणात अडचणी येतील. त्यावर आपण हरकती घ्या. सुनावणी होईल. उपविभागीय अधिकाऱ्यांनी दिलेला निर्णंय मान्य नसेल तर जिल्हाधिकारी, लवाद, न्यायालय असे वेगवेगळे टप्पे तुमच्यासाठी उपलब्ध आहेत. निर्णय लागत नाही तोपर्यंत संबंधित मोबदला दिला जाणार नाही. मात्र भुमी अधिग्रहण थांबणार नाही. काहींना मोबदल्याची रक्कम वाढवून हवी असेल तर त्यांनी जिल्ह्याधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील नेमलेल्या लवादाकडे अर्ज करावा. मुंबई गोवा महामार्गातील काहीजणांना वाढीव मोबादला देण्याचा निर्णय लवादाने दिला होता. मात्र कायदेशीर लढाई ही मालक निश्चित करणे, मोबादला वाढवून देणे या गोष्टींसाठी असल्याने भुमी अधिग्रहणाशी त्याचा काहीही संबध नाही. भुमी अधिग्रहीत करुन ती राष्ट्रीय महामार्ग मंडळाच्या ताब्यात देण्याची प्रक्रिया आजपासून सुरू झाली असल्याचे लिगाडे यांनी स्पष्ट केले. Land acquisition process at Guhagar
मार्गताम्हाने बाजारपेठही होणार मोकळी
मार्गताम्हाणे बाजारपेठेतील व्यापाऱ्यांना थोड्या उशिरा नोटीसा पाठवल्या आहेत. त्यामुळे 60 दिवसांची अंतिम मुदत संपल्यानंतर तेथील भुमी अधिग्रहणालाही सुरवात होणार आहे. Land acquisition process at Guhagar
