अध्यक्षपदी साहित्यिक व लोककलावंत शाहिद खेरटकर यांची निवड
गुहागर, ता. 21 कोकणातील साहित्य, भाषा व लोककलेच्या जपणुकीसाठी कार्यरत असलेल्या कोकण मराठी साहित्य परिषद गुहागर तालुका शाखेची नवी कार्यकारिणी दिनांक २० जुलै २०२५ रोजी शृंगारतळी येथील लोकनेते स्व. रामभाऊ बेंडल सभागृहात आयोजित वार्षिक सर्वसाधारण सभेत जाहीर करण्यात आली. यावेळी अध्यक्षपदी प्रसिद्ध साहित्यिक व लोककलावंत श्री. शाहिद खेरटकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. Konkan Marathi Sahitya Parishad Guhagar

या कार्यकारिणीत अध्यक्षपदी शाहिद खेरटकर, उपाध्यक्ष मोहन पाटील, कार्याध्यक्ष बाळासाहेब लबडे, सचिव ईश्वरचंद्र हलगरे, कोषाध्यक्ष दिनेश महादेव खेडेकर, युवा शाखाप्रतीनिधी योगेश होळंब, सदस्यपदी योगेश होळंब, रजत बेलवलकर, रामेश्वर सोळंके, विश्वास वसेकर इत्यादींची बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडीनंतर आयोजित बैठकीत कोकण मराठी साहित्य परिषदेचे केंद्रीय सदस्य व कोकण विभाग युवा शक्ति अध्यक्ष अरुण मौर्य यांनी नव्याने निवडून आलेल्या कार्यकारिणीचे अभिनंदन करताना तालुकास्तरावर अधिक सक्रिय आणि लोकाभिमुख साहित्य चळवळ उभारण्याचे आवाहन केले. Konkan Marathi Sahitya Parishad Guhagar

ही नवी कार्यकारिणी एप्रिल २०२५ ते मार्च २०२८ या कालावधीसाठी कार्यरत राहणार असून, आगामी काळात विद्यार्थ्यांसाठी साहित्यप्रवृत्त कार्यक्रम, लोककला महोत्सव, मराठी संवर्धन उपक्रम व गावोगाव साहित्य कट्ट्यांच्या आयोजनाचे संकल्प व्यक्त करण्यात आले. गुहागर तालुक्यातील साहित्यिक चळवळीला नवी दिशा देणारी ही कार्यकारिणी ठरेल, असा विश्वास साहित्यप्रेमींनी व्यक्त केला. Konkan Marathi Sahitya Parishad Guhagar