गुरुवारी, २ सप्टेंबरला रोहन फडके यांचे मोफत सत्र गुगल मीटवर
गुहागर, ता. 01 : मोबाईल, टीव्ही आणि इंटरनेट यामुळे शेअर मार्केट म्युच्युअल फंड सही आहे, ही वाक्य ग्रामीण भागातही ऐकू येवू लागली आहेत. पण त्यात गुंतवणूक कशी करायची असा प्रश्र्न पडतो. या सर्व प्रश्र्नांची उत्तर देणारं एक सत्र आज गुरुवार, दि. 2 सप्टेंबरला गुगल मीटवर आयोजीत करण्यात आले आहे. एमबीए फायनान्स असे शिक्षण घेतलेले रोहन फडके शेअर मार्केट संदर्भात प्राथमिक माहिती देणार आहेत. तरी या सत्रासाठी सर्वांनी गुगल मीटवर सहभागी व्हावे असे आवाहन रोहन फडके यांनी केले आहे.
Through Mobile, TV and internet; the words like stock market, mutual fund reached in Rural areas as well. But the question is how to invest in it. A session answering all these questions will be held on Google Meet on Thursday, September 2nd. Rohan Phadke, an MBA Finance graduate, will provide basic information on the stock market.
अजुनही अनेकांच्या मनात शेअर मार्केटबद्दल भितीयुक्त कुतहूल आहे. म्युच्युअल फंडमध्ये मोठी रक्कमच गुंतवावी लागते. असा गैरसमज आहे. आपल्या मनातील प्रश्र्नांची उत्तरे सहज कोणी देत नाही. आणि उत्तर देणारा भेटलाच तर त्याचं एक वाक्य नेहमीचच असतं. पैसे गुंतवताना अभ्यास पाहिजे. हे वाक्य ऐकल्यावर आपण आणखी धास्तावतो. आणि ही भानगड नको रे बाब असे म्हणून लांब पळतो.
परंतू बँक, पोस्टात पैसे ठेवावेत त्या पध्दतीने चांगला फायदा देणाऱ्या म्युच्युअल फंडात आपण सोप्या पध्दतीने पैसे गुंतवू शकतो. हे कोणी सांगितलं तर विश्र्वास बसत नाही.
म्हणूनच हे क्षेत्र नेमकं काय आहे. त्यात पैसा कसा गुंतवला जातो. त्यातून जास्त पैसे कसे मिळतात, 100, 200 रुपये सुध्दा दरमहा आपण गुंतवून चालतात का. अशा अनेक प्रश्र्नांची खरीखुरी ओळख करुन देण्यासाठी रोहन फडके यांनी एका माहिती सत्राचे आयोजन केले आहे. यानिमित्ताने घरबसल्या शेअर मार्केटबद्दल फुकट माहिती मिळण्याची संधी सर्वांना मिळत आहे. त्यामुळे हे माहितीसत्र आपण सर्वांनी ऐकावे. असे आवाहन रोहन फडके, एमबीए फायनान्स यांनी केले आहे.
माहिती सत्राची वेळ : गुरुवार, दि. 2 सप्टेंबर 2021 रोजी रात्री 9 वा.
गुगल मीट लिंक : https://meet.google.com/nez-pfse-smv