पंचायत राज अभियान, मुख्यमंत्र्याच्या हस्ते सन्मानित
गुहागर, ता. 12 : तालुक्यातील खामशेत ग्रामपंचायतीन मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान 2025-26 मध्ये राज्यात द्वितीय क्रमांक मिळवला. नाशिक येथे रविवारी (ता. 10) राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते खामशेत ग्रामपंचायतीला सन्मानित करण्यात आले. Khamshet Gram Panchayat is the second in the state
नाशिक मधील पुरस्कार वितरण सोहळ्यात खामशेतचे सरपंच मंगेश सोलकर, गुहागर पंचायत समितीचे सभापती प्रणव पोळेकर, उपसभापती नीलेश सुर्वे यांच्यासह रत्नागिरी जिल्हा परिषदचेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सागर पाटील व गुहागरचे गटविकास अधिकारी प्रदीप शिंदे आदींनी हा पुरस्कार स्विकारला. Khamshet Gram Panchayat is the second in the state
खामशेत ग्रामपंचायतीने यापूर्वीही निर्मल ग्रामपंचायत, महात्मा गांधी तंटामुक्त गाव राज्यस्तरीय पुरस्कार मिळाला. संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात तालुका व जिल्हास्तरावर ग्रामपंचायतीने प्रथम क्रमांक मिळवला. आर. आर. (आबा) पाटील स्वच्छ व सुंदर गाव योजनेत तालुकास्तरीय प्रथम क्रमांक यासह अनेक राज्य, जिल्हा व तालुकास्तरीय पुरस्कार मिळवले आहे. मंगेश सोलकर यांच्या नेतृत्वात गेली काही वर्ष खामशेत ग्रामपंचायत शासकीय योजनांमध्ये प्रभावी काम करत आहे. संजय गांधी निराधार योजना, वृद्धापकाळ योजना, श्रावणबाळ योजना, प्रधानमंत्री सुरक्षा बिमा योजना, जीवन ज्योती विमा योजना, किसान क्रेडिट कार्ड, ई श्रम कार्ड, पंतप्रधान किसान, बांधकाम मजूर कल्याणकारी योजना आदी शासकीय योजना ग्रामस्थांपर्यत पोचवून निकष पूर्ण असलेल्या सर्व ग्रामस्थांना या योजनांचा लाभ ग्रामपंचायतीने मिळवून दिला. Khamshet Gram Panchayat is the second in the state

त्याचप्रमाणे गावाच्या सर्वांगिण विकासासाठी 80 हेक्टर क्षेत्रावर फळबाग लागवड, भात पीक विमासाठी ग्रामस्थांना प्रोत्साहन, 100 टक्के महसूल संकलन, प्रत्येक घरात शौचालय व शाळेत स्वच्छतागृहे, घनकचरा व्यवस्थापन अशी विकासात्मक कामेही आपण केली आहेत. ग्रामविकासात ग्रामस्थांचा सहभाग घेऊन 75 लाखांची कामे श्रमदानातून केली आहेत. सांडपाणी व्यवस्थापनाचे उत्तम नियोजन करत जिल्ह्यातील पहिले शोषखड्डे युक्त गाव म्हणून खामशेत ग्रामपंचायतीला ओडीएफ प्लस ग्राम घोषित करण्यात आले. महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत तालुक्यातील सर्वाधिक कामे करणारे खामशेतही पहिली ग्रामपंचायत आहे. गेल्या 10 वर्षात खामशेतमधील एकही ग्रामसभा तहकूब झालेली नाही. असे काम करणाऱ्या ग्रामपंचायतीला आज पंचायत राज अभियानात राज्यस्तरावर द्वितीय क्रमाकांच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. Khamshet Gram Panchayat is the second in the state
या पुरस्कार वितरण सोहळ्याला गुहागर तालुक्यातील साखरी त्रिशुलचे सरपंच सचिन म्हसकर, धोपावेचे सरपंच आशीर्वाद पावस्कर, खोडदेचे सरपंच प्रतिक पवार, खामशेतचे प्रशासक चंद्रकांत कारंडे, ग्रामसेवक मोहिरे आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ आदी मंत्री प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. Khamshet Gram Panchayat is the second in the state
का मिळाला ग्रामपंचायत खामशेतला पुरस्कार
१. सुशासनयुक्त पंचायत
* ग्रामपंचायतीमार्फत १ ते ७ प्रकारचे दाखले उपलब्ध करून देण्याची सुविधा.
* विविध शासकीय दाखले व योजनांचा लाभ १००% उपलब्ध करून देण्याचा उपक्रम.
* मागील १० वर्षांत गावात कोणतीही तक्रार नसल्याची उल्लेखनीय कामगिरी.
२. सक्षम व आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण पंचायत
* आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी, म्हणजे १ एप्रिल रोजी १००% घरपट्टी व पाणीपट्टी वसुली.
* मागील १० वर्षांत एकही ग्रामसभा तहकूब न होण्याची सातत्यपूर्ण कामगिरी.
३. जलसंवर्धन व पर्यावरण संरक्षण
* ४३५ कुटुंबांमध्ये १००% शोषखड्डे; त्याद्वारे दररोज अंदाजे एक लाख लिटर पाणी जमिनीत जिरवले जाते.
* पावसाचे पाणी जमिनीत मुरवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जलसंधारणात्मक उपाययोजना.
* ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील सर्व संस्थांमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंगची व्यवस्था.
* गावात प्लास्टिक बंदीची प्रभावी अंमलबजावणी.
४. स्वच्छ, सुंदर व कचरामुक्त गाव
* ओला व सुका कचरा वर्गीकरण करून ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मिती.
* गांडूळखत व नाडेप प्रकल्पांद्वारे सेंद्रिय खतनिर्मितीला प्रोत्साहन.
* ४३५ कुटुंबांना ओल्या कचऱ्याच्या प्रक्रियेसाठी सुविधा उपलब्ध.
* प्रत्येक अमावस्येनंतर येणाऱ्या सोमवारी *‘पाळी सोमवार’* उपक्रमांतर्गत ग्रामस्थांचा सामूहिक स्वच्छता व ग्रामविकासात सहभाग.
५. आरोग्यसंपन्न व सामाजिकदृष्ट्या सक्षम गाव
* १००% आयुष्मान भारत व आभा कार्ड निर्मितीद्वारे नागरिकांना आरोग्य सुविधांशी जोडण्याचा उपक्रम.
* पात्र लाभार्थ्यांना शासकीय आरोग्य योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न.
६. महिला सक्षमीकरण व आर्थिक विकास
* उमेद अभियानांतर्गत गावातील महिलांना बचत गटांच्या माध्यमातून संघटित करून आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्याचा उपक्रम.
* बचत गटांना कर्जसुविधा व प्रोत्साहन देऊन महिलांसाठी विविध लघुउद्योग आणि व्यवसायवृद्धीला चालना.
*ग्रामीण पाणीपुरवठा योजना चालविण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी बचत गटातील सक्षम महिला यशस्वीपणे पार पाडत आहेत.
* पाणीपुरवठा योजनेचे व्यवस्थापन, दैनंदिन कामकाज आणि नागरिकांना पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी त्या सक्रियपणे योगदान देत आहेत.
* केवळ बचत व कर्जव्यवहारापुरते मर्यादित न राहता, गावातील सार्वजनिक सुविधांच्या व्यवस्थापनातही महिलांनी पुढाकार घेतला आहे. महिलांचा हा सहभाग म्हणजे महिला सक्षमीकरणाचे आणि ग्रामीण विकासातील त्यांच्या वाढत्या नेतृत्वाचे उत्तम उदाहरण आहे.
७. बालकांमध्ये वाचनसंस्कृती व शैक्षणिक प्रगती
* दररोज सायंकाळी ७ ते ९ या वेळेत वाचनसंस्कृती उपक्रम.
* मुलांसाठी सामूहिक वाचन, अभ्यासवर्ग आणि ज्ञानवृद्धीसाठी सातत्यपूर्ण प्रयत्न.
८. सौरऊर्जेच्या दिशेने वाटचाल — सोलर गावाचा संकल्प
* मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या माध्यमातून गावात सौरऊर्जेचा वापर वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न.
* गावातील एकूण ४३५ कुटुंबांपैकी *१०० घरांवर सोलर यंत्रणा बसविण्याचे काम पूर्ण*, त्यामुळे सौरऊर्जेच्या दिशेने खामशेतने महत्त्वपूर्ण पाऊल टाकले आहे.
* पारंपरिक ऊर्जेवरील अवलंबित्व कमी करणे, वीजबिलात बचत करणे आणि पर्यावरणपूरक ऊर्जेचा वापर वाढविणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश.
* उर्वरित घरांमध्येही सौरऊर्जेचा वापर वाढवून खामशेतला *‘सोलर गाव’* बनविण्याचा ग्रामपंचायतीचा संकल्प. Khamshet Gram Panchayat is the second in the state
