खरे – ढेरे- भोसले महाविद्यालयात आयोजन
गुहागर : येथील खरे – ढेरे -भोसले महाविद्यालयातील संशोधन समिती आणि अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष ( आय क्यू ए.सी. ) यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतीच बौध्दीक संपदा अधिकार या विषयावर ऑनलाइन कार्यशाळा झाली . सदर कार्यशाळेसाठी प्रमुख वक्ते म्हणून राजारामबापू तंत्रज्ञान संस्था ईस्लामपूर जि. सांगली येथील इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार विभागाचे प्रा.डॉ . आनंदराव बी काकडे यांनी मार्गदर्शन केले.
या ऑनलाइन कार्यशाळेमध्ये प्रा. डॉ. आनंदराव काकडे यांनी बौध्दीक संपदा अधिकार यांचे प्रकार, तसेच त्यांची मांडणी कशी करायची ? याविषयीचे मार्गदर्शन केले . याव्यतिरिक्त संशोधन कशा पध्दतीचे असावे आणि त्याचे शैक्षणिक महत्व कसे आहे, याविषयीचे मार्गदर्शनही केले . आजच्या काळामध्ये संशोधन आणि बौध्दीक संपदा अधिकार यांचे उच्च शिक्षण विभागामध्ये असणारे महत्व या विषयावर अतिशय सखोल मार्गदर्शन केले. पुढील काळामध्ये महाविद्यालयाचे मुल्यांकनही संशोधन आणि नाविन्यपूर्ण संशोधन यावरच अवलंबून असेल हे देखील अधोरेखित केले. नाविन्यपूर्ण संशोधनाचा उपयोग हा उच्च शिक्षण घेणा-या विद्यार्थ्याकरीता देखील प्रोत्साहन देणारा असेल. ज्यामुळे विद्यार्थ्यांची संशोधन आणि नाविन्यपूर्ण प्रयोग करण्याची आवड निर्माण करण्यास मदत होईल असे प्रा . डॉ . आनंदराव काकडे यांनी सांगितले.
या ऑनलाइन कार्यशाळेसाठी गुहागर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष महेश जनार्दन भोसले यांचे सहकार्य मिळाले. महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. अनिल सावंत यांनी ऑनलाइन कार्य शाळेविषयी असणारे महत्व सांगितले. सदर कार्यक्रमाचे आयोजन प्रा. डॉ. ऋषिकेश गोळेकर यांनी केले. तर सूत्रसंचालन प्रा. पदमनाभ सरपोतदार यांनी केले. कार्यशाळेला ४९ सदस्यांनी ऑनलाईन सहभाग नोंदवला. यामध्ये बाहेरील राज्यातील काही विद्यार्थी आणि संशोधक उपस्थित होते. आयोजित ऑनलाईन कार्यशाळेचे थेट प्रक्षेपण यूटूबच्या माध्यमातूनही करण्यात आले. सदर कार्यक्रमासाठी अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे प्रमुख प्रा . गोविंद सानप यांचे विशेष सहकार्य लाभले . याशिवाय सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचेही सहकार्य मिळाले.