दासनवमीनिमित्त कुवारबाव पंचक्रोशी ब्राह्मण सभा आयोजित
रत्नागिरी, ता. 04 : कुवारबाव पंचक्रोशी ब्राह्मण सभेने दासनवमीनिमित्त आयोजित केलेल्या करुणाष्टक व रामरक्षा पठण स्पर्धेला पंचक्रोशीतील शालेय विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद लाभला. १६० विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत भाग घेऊन सादरीकरण केले. विजेत्यांना अध्यक्ष अनंत आगाशे, उपाध्यक्ष रवींद्र इनामदार, सचिव रवींद्र रानडे, खजिनदार विलास कुलकर्णी, परीक्षक वंदना घैसास व शिक्षिका जुई पाटणकर यांच्या हस्ते गौरवण्यात आले. Karunashtak, Rama Raksha competition
दासनवमीनिमित्त गेली अनेक वर्षे कुवारबाव पंचक्रोशी ब्राह्मण सभेच्या नाचणे येथील यशवंत हरी गोखले भवनात स्पर्धा आयोजित केली जात आहे. यामध्ये ब्राह्मण व हिंदू धर्मीय विद्यार्थ्यांना सहभाग घेता येतो. Karunashtak, Rama Raksha competition

या स्पर्धेचे परीक्षण सौ. वंदना घैसास, सौ. दीप्ती आगाशे, जयराम आठल्ये, सौ. सुरेखा जोशी, सौ. स्नेहा जोशी, विद्याधर चिंचळकर, सौ. मुग्धा कुळकर्णी, सौ. मधुरा आचार्य, सौ. श्रद्धा जोशी, सौ. अर्चना जोशी, सौ. उर्मिला पटवर्धन, सौ. अर्चना देवधर, अविनाश फाटक यांनी केले. या सर्वांना पुष्परोपटे देऊन आभार मानण्यात आले. Karunashtak, Rama Raksha competition
यावेळी वंदना घैसास म्हणाल्या, शब्दोच्चार, उच्चारण कसे आहेत, पाठांतर पूर्ण झाले आहे का, सादरीकरण यांचा विचार करून परीक्षकांनी गुण दिले आहेत. विद्यार्थ्यांची चांगली तयारी झाल्याचे दिसले. करुणाष्टक, रामरक्षेचे पठण विद्यार्थ्यांनी नियमित करावे. त्याचा उपयोग होईल. या स्पर्धेला भरपूर प्रतिसाद मिळाला. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी कुवारबाव ब्राह्मण पंचक्रोशीचे सक्रिय कार्यकर्ते, महिलांनी मेहनत घेतली. Karunashtak, Rama Raksha competition
