• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
31 May 2025, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

कोंडकारुळच्या कमलेशची लोणावळ्यात हत्या

by Mayuresh Patnakar
May 27, 2025
in Guhagar
408 4
0
Kamlesh of Kondkarul killed in Lonavala
801
SHARES
2.3k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

किरकोळ वादातून मच्छीमार पर्यटकांवर जीवघेणा हल्ला

गुहागर, ता. 27 : चारचाकी वाहन वळवताना दुसऱ्याला जागा देण्यावरुन झालेल्या वादातून लोणावळा येथे गुहागर तालुक्यातील अडूर कोंडकारुळ गावच्या कमलेश तानाजी धोपावकर (वय 45) याची हत्या करण्यात आली. कमलेशचे अन्य दोन सहकारी देखील जखमी झाले आहेत. या  प्रकरणात लोणावळा पोलीसांनी या घटनेमधील 9 संशयितांविरुध्द गुन्हा दाखल केला असून चारजणांना अटक केली आहे. ही घटना रविवारी 25 मे रोजी रात्री उशिरा घडली.  दरम्यान पर्यटनाला गेलेल्या तरुणाचा खून झाल्यामुळे कोंडकारुळ गावावर शोककळा पसरली आहे. Kamlesh of Kondkarul killed in Lonavala

Kamlesh of Kondkarul killed in Lonavala
कमलेश तानाजी धोपावकर

गुहागर तालुक्यातील अडूर कोंडकारुळमधील कमलेश तानाजी धोपावकर, आपल्या मित्रांसह करंजा बंदरातील बोटीवर काम करत होते. समुद्रात वादळसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याने 30 मे पूर्वीच मच्छीमारी थांबली. त्यामुळे कमलेश ज्या बोटीवर काम करत होता त्या बोटीच्या नाखवाने बोटीवरील सर्वांना सोबत घेवून लोणावळातील मच्छीमार समाजाचे कुलदैवत श्री एकविरा आईच्या दर्शनाला जाण्याचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे कमलेश आणि 16 जण लोणावळा येथे भाड्याच्या वाहनाने गेले, लोणावळा येथे एका फार्महाऊसमधील खोली त्यांनी घेतली. तेथे स्नान करुन ते  देवदर्शनाला गेले. सायंकाळी फार्महाऊसवरुन निघताना त्याच ठिकाणी रहायला आलेल्या 4-5 जणांजवळ गाडी वळवण्यावरुन त्यांचा वाद झाला. मात्र हा वाद फार्महाऊसच्या मालकाने मिटवला. त्यानंतर कमलेश आणि सहकारी आपले वाहन घेवून तेथून बाहेर पडले. अवघ्या 15 मिनिटांत एक कार, एक रिक्शा व एका दुचाकीवरुन आलेल्या तरुणांनी आपल्या गाड्या आडव्या घालून कमलेश आणि सहकारी असलेले वाहन अडविले. वाहनाची किल्ली काढून घेतली आणि कमलेश आणि सहकाऱ्यांना काठ्या व रॉडनी मारहाण करायला सुरवात केली. यामध्ये कमलेशला खूप मारहाण झाली. त्यांच्या डोक्यावर वर्मी घाव बसला. कमलेशचा सहकारी मनोज वरवाटकरचा (बोटीचा तांडेल) हात जायबंदी झाला. तर प्रज्वल मेहताच्या डोक्याला मार लागला. कमलेश गतप्राण झाल्याचे लक्षात येताच आलेल्या तरुणांनी तेथून पोबारा केला.  कमलेश, मनोज आणि प्रज्वलला स्थानिकांच्या मदतीने ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. रस्त्यावर वाहने मोठ्या प्रमाणात असल्याने गतप्राण झालेल्या कमलेशला अक्षरश: उचलून घेवून धावतपळत रुग्णालयात नेण्यात आले. परंतू वैद्यकिय अधिकाऱ्यांनी कमलेशला मृत घोषीत केले. 26 मे रोजी त्यांच्या सहकाऱ्यांनी कमलेशचा मृतदेह कोंडकारुळ गावात आणला. शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. Kamlesh of Kondkarul killed in Lonavala

दरम्यान घटनेची माहिती मिळताच लोणावळा ग्रामीणचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तातडीने प्रत्यक्षदर्शीं व सीसीटीव्ही फुटेजद्वारे हल्लेखोरांचे तपशील गोळा केले. वेगाने तपास करत 9 जणांपैकी दोघांना पोलीसांनी 25 मे रोजी रात्रीच अटक केली. उर्वरित दोघांना 26 मे रोजी लग्नाच्या मांडवातून पोलीसांनी उचलले. उर्वरित पाचजणांचा शोध लोणावळा पोलीस घेत आहेत. आजपर्यंत निकेश कांबिरे, (रा. वेहेर गांव तामावळ, लोणावळा ग्रामीण), प्रतिक देशमुख (रा. वेहेर गांव तामावळ, लोणावळा ग्रामीण), यश कैलास पडवळ  (रा. वेहेर गांव तामावळ, लोणावळा ग्रामीण), आणि गौस संजय पट्टाधारी, (रा. तुंगार्ली, लोणावळा) यांना अटक केली आहे. उर्वरित पाचजणांचा शोध लोणावळा पोलीस घेत आहेत. Kamlesh of Kondkarul killed in Lonavala

Tags: GuhagarGuhagar NewsKamlesh of Kondkarul killed in LonavalaLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share320SendTweet200
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.