• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
24 February 2026, Tuesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

डॉ.ओंकार खोत अपरांत मध्ये पूर्ण वेळ रुजू

by Guhagar News
February 23, 2026
in Guhagar
37 0
0
Join Omkar Khot Aparant full time
72
SHARES
205
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

कुशल वैद्यकीय तज्ञ आणि अद्ययावत वैद्यकीय सुविधा यांचा समसमा संयोग

गुहागर, ता. 23 : चिपळूणातील सुप्रसिद्ध अपरांत हॉस्पिटल येथे मिरज व सोलापूर प्रशिक्षित डॉ. ओंकार खोत पूर्णवेळ फिजिशियन म्हणून नुकतेच रुजू झाले आहेत. महाराष्ट्राचे आरोग्य केंद्र असलेल्या मिरज येथील सुपरिचित गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजमधून त्यांनी पदवी शिक्षण व पदव्युत्तर शिक्षण एम.डी.( मेडिसिन) सोलापूर येथून पूर्ण केले आहे. त्यांच्या सर्व वैद्यकीय शिक्षणादरम्यान त्यांनी विशेष गुणवत्ता सातत्याने राखली आहे. Join Omkar Khot Aparant full time

डॉ. ओंकार खोत यांनी आपत्कालीन परिस्थितीतील व्हेंटिलेटर मॅनेजमेंट, आय सी यु केअर व तातडीच्या जीवन रक्षक उपचारांचे विशेष प्रशिक्षण घेतले असून त्यामध्ये उल्लेखनीय प्राविण्य मिळवले आहे. अपरांत हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागातील व्हेंटिलेटर, टु डी इको, कार्डियाक मार्कर्स, यासारख्या अत्याधुनिक सुविधा व डॉ.ओंकार यांनी संपादित केलेले अद्ययावत वैद्यकीय शिक्षण यांच्या संयोगामुळे अपरांत हॉस्पिटलच्या मेडिसिन विभागातील हृदयविकार, डायबिटीस, पक्षाघात, श्वसन विकार, या व्यतिरिक्त अन्य गुंतागुंतीच्या आजारांवरील रुग्णसेवा अधिक प्रभावी आणि रुग्णाभिमुख ठरणार आहे. Join Omkar Khot Aparant full time

अपरांत हॉस्पिटल ने मुंबई,पुणे, मिरज यासारख्या मोठया शहरात मिळणाऱ्या आरोग्य सुविधा व तज्ञ डॉक्टर मंडळी चिपळूण येथेच उपलब्ध व्हावीत यासाठी के ई एम  प्रशिक्षित ज्येष्ठ सर्जन डॉ. सद्गुरु पाटणकर, जे जे हॉस्पिटल प्रशिक्षित ज्येष्ठ फिजिशियन डॉ. शशिकांत गायकवाड,मिरज प्रशिक्षित अनुभवी महिला सर्जन डॉ भक्ती पालांडे, आदित्य बिर्ला हॉस्पिटल पुणे प्रशिक्षित ऑर्थोपेडिक कन्सल्टंट डॉ. श्रीश भास्करवार, सुप्रसिद्ध लीलावती हॉस्पिटल मुंबई  प्रशिक्षित पल्मनोलोजिस्ट(श्वासनविकारतज्ञ) डॉ.सौरभ सुर्वे, तज्ञ रेडिओलॉजिस्ट व सोनोग्राफी तज्ञ डॉ सचिन विधाते, सुप्रसिद्ध पॅथॉलॉजिस्ट डॉ सुरज शिकलगार या तज्ञ डॉक्टरांचा चमू तत्पर रुग्णसेवेसाठी नेहमीच पूर्णवेळ उपलब्ध ठेवला आहे. अपरांत मध्ये तज्ञ डॉक्टरांद्वारे दिल्या जाणाऱ्या रुग्णसेवेच्या उज्वल परंपरेमध्ये डॉ.ओंकार खोत यांच्या पूर्णवेळ फिजिशियन म्हणून झालेल्या नियुक्तीमुळे एक मोलाची भर पडणार आहे. Join Omkar Khot Aparant full time

Tags: GuhagarGuhagar NewsJoin Omkar Khot Aparant full timeLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share29SendTweet18
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.