• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
18 July 2026, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

वेळणेश्वर प्रशालेत साहित्यिकांचा संवाद

by Manoj Bavdhankar
July 18, 2026
in Guhagar
48 0
0
Interaction with Litterateurs at Velaneshwar High School
94
SHARES
269
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

‘लेखक, कवी आपल्या भेटीला’ उपक्रम; पीएमश्री ई-ग्रंथालयाचे उद्घाटन

गुहागर. ता. 18: तालुक्यातील एकमेव पीएमश्री मानांकन प्राप्त वेळणेश्वर नं. १ प्रशालेत पीएमश्री हरित शाळा उपक्रमांतर्गत ‘लेखक, कवी आपल्या भेटीला’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. ‘प्रसिद्ध तज्ञ व्यक्तींचे व्याख्यान (Expert Talk)’ या उपक्रमातून विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकातील लेखक, कवी आणि साहित्यिकांशी प्रत्यक्ष संवाद साधण्याची अनोखी संधी मिळाली. Interaction with Litterateurs at Velaneshwar High School

Interaction with Litterateurs at Velaneshwar High School

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र साहित्य परिषद व ज्ञानरश्मी वाचनालय, गुहागरचे अध्यक्ष तसेच इयत्ता सहावीच्या मराठी पाठ्यपुस्तकात कविता समाविष्ट असलेले ज्येष्ठ कवी राजेंद्र आरेकर उपस्थित होते. यावेळी त्यांच्या पत्नी सुनेत्रा आरेकर यांचीही उपस्थिती होती. यावेळी लेखिका व कीर्तनकार प्रा. मनाली बावधनकर, ग्रंथपाल सोनाली घाडे, कवी ज्ञानेश्वर झगडे, कादंबरीकार ईश्वर हलगरे, शिघ्रकवी सुधाकर कांबळे तसेच लेखक व बालभारती सदस्य डॉ. मनोज पाटील यांनी विद्यार्थ्यांशी मुक्त संवाद साधत साहित्यनिर्मिती, वाचन संस्कृती, भाषा संवर्धन आणि सर्जनशील लेखनाचे महत्त्व सांगितले. Interaction with Litterateurs at Velaneshwar High School

Interaction with Litterateurs at Velaneshwar High School

याच कार्यक्रमात कवी राजेंद्र आरेकर यांच्या हस्ते पीएमश्री ई-ग्रंथालयाचे उद्घाटन करण्यात आले. या ई-ग्रंथालयातून विद्यार्थ्यांना डिजिटल पुस्तके वाचनासाठी उपलब्ध होणार असून उपस्थित मान्यवरांनी या उपक्रमाचे कौतुक केले. कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्या नेत्रा ठाकूर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संदीप गावणंग, उपाध्यक्ष वैभव ठाकूर, समिती सदस्य तसेच माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष विश्वजीत जामसुतकर यांची प्रमुख उपस्थिती होती. Interaction with Litterateurs at Velaneshwar High School

Interaction with Litterateurs at Velaneshwar High School

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक सतीश नलावडे, शिक्षक बिपिन विचारे, शैलजा साळे, बाबासाहेब राशिनकर, सुलक्षणा करडे-राशिनकर, भारती गोवेकर-वावरे, प्रियांका पवार, अंजूम शेख, तेजस्विनी जगताप, आकांक्षा खरे आणि साक्षी खरे यांनी विशेष परिश्रम घेतले. सूत्रसंचालन बाबासाहेब राशिनकर यांनी केले. शालेय शिक्षणासोबत विद्यार्थ्यांमध्ये साहित्य, वाचन आणि सर्जनशील विचारांची आवड निर्माण करणारा हा उपक्रम सर्वांच्या कौतुकास पात्र ठरला. Interaction with Litterateurs at Velaneshwar High School

Interaction with Litterateurs at Velaneshwar High School

Tags: GuhagarGuhagar NewsInteraction with Litterateurs at Velaneshwar High SchoolLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share38SendTweet24
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.