शास्त्रज्ञांनी विकसित केली लवचिक, सुरक्षित आणि पर्यावरणासाठी अनुकूल बॅटरी
गुहागर, ता. 16 : भारतीय शास्त्रज्ञांनी लवचिक, सुरक्षित आणि पर्यावरणासाठी अनुकूल बॅटरी तंत्रज्ञान विकसित केले आहे, जे बॅटरीला कागदासारखे दुमडण्याइतके लवचिक बनवते आणि कोणतीही खबरदारी न घेता स्पर्श करण्यासाठी सुरक्षित आहे. Indian Scientists’ Step Towards Sustainable Energy
सामान्यतः वापरल्या जाणाऱ्या लिथियम-आयन बॅटरी जास्त गरम होऊन स्फोट होण्याची भीती असते. परंतु, भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या सेंटर फॉर नॅनो अँड सॉफ्ट मॅटर सायन्सेस च्या बंगळूरू येथील संशोधकांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स येथील सेंटर फॉर नॅनो सायन्स अँड इंजिनिअरिंग यांच्या सहकार्याने एक नवीन बॅटरी तंत्रज्ञान विकसित केले आहे. हे तंत्रज्ञान फोन, लॅपटॉप, इलेक्ट्रिक वाहने आणि परिधान करण्यायोग्य उपकरणांमध्ये (wearable devices) वापरल्या जाणाऱ्या पारंपरिक लिथियम-आयन बॅटरीला पर्याय ठरू शकते. Indian Scientists’ Step Towards Sustainable Energy
या नवीन बॅटरीमध्ये पृथ्वीवर मुबलक प्रमाणात उपलब्ध असलेल्या अल्युमिनियमचा आणि जल-आधारित द्रावणाचा वापर केला जातो. हे मिश्रण बॅटरीला अधिक सुरक्षित, स्वस्त आणि पर्यावरणासाठी अधिक अनुकूल बनवते. यामुळे बॅटरीचा स्फोट आणि पर्यावरणीय धोक्यांपासून संरक्षण मिळू शकते, तसेच उपकरणांची विजेची गरजही कमी होऊ शकते. अल्युमिनियममध्ये ऊर्जा साठवण्याची आणि सोडण्याची क्षमता जास्त असली तरी, त्याच्या जटिल रसायनशास्त्रामुळे त्याचा वापर करणे कठीण होते. बंगळूरूच्या शास्त्रज्ञांनी सूक्ष्म स्तरावर सामग्रीमध्ये बदल करून या समस्यांचे निराकरण केले. Indian Scientists’ Step Towards Sustainable Energy

ही नाविन्यपूर्ण बॅटरी कार्यक्षमतेने आणि विश्वसनीयतेने ऊर्जा साठवते. 150 चार्ज-डिस्चार्ज सायकल नंतरही ती आपली 96.77% ऊर्जा टिकवून ठेवते, ज्यामुळे बॅटरीचे आयुष्य वाढते. ही बॅटरी वाकवली किंवा पूर्णपणे अर्धी दुमडली तरीही काम करते. हे दाखवण्यासाठी, शास्त्रज्ञांनी बॅटरीला तीव्र कोनात वाकवल्यावरही एका LCD डिस्प्लेला सतत ऊर्जा दिली. यामुळे भविष्यात कपड्यांमध्ये सहजपणे जोडता येण्यासारखी रोल-अप गॅजेट्स विकसित करण्यास मदत होऊ शकते. Indian Scientists’ Step Towards Sustainable Energy
शास्त्रज्ञांनी बॅटरीचे घटक उच्च कार्यक्षमतेसाठी संतुलित आहेत की नाही, हे तपासण्यासाठी प्रगत सूक्ष्म साधनांचा वापर केला. त्यांनी बॅटरीची कार्यक्षमता, टिकाऊपणा आणि लवचिकता सुनिश्चित करण्यासाठी कठोर चाचण्या केल्या. या शोधामुळे अनेक दैनंदिन उपकरणांसाठी महत्त्वाचे फायदे मिळतील. लवचिक स्मार्टफोन, सुरक्षित इलेक्ट्रिक वाहने आणि कपड्यांमध्ये जोडलेली परिधान करण्यायोग्य उपकरणे यांचा विकास यामुळे शक्य होऊ शकतो. याशिवाय, अल्युमिनियम, जे मुबलक आणि पर्यावरणासाठी अनुकूल संसाधन आहे, त्याचा वापर व्यापक शाश्वततेच्या ध्येयांना पाठबळ देतो. हा शोध मल्टीव्हॅलंट आयन बॅटरी तंत्रज्ञानातील मोठी झेप आहे. सध्या सुरू असलेल्या सुधारणांमुळे चालू असलेल्या सुधारणांमुळे, अशा बॅटरी लवकरच आपल्या दैनंदिन जीवनातील अनेक व्यवहारांमध्ये एक मानक भाग बनू शकतात आणि देशाला सुरक्षित, शाश्वत आणि जागतिक पर्यावरणीय उद्दिष्टांशी संलग्न असलेल्या, पुढील पिढीच्या ऊर्जा साठवणुकीच्या उपायांच्या विकासात आघाडीवर ठेवू शकतात. Indian Scientists’ Step Towards Sustainable Energy