गुहागर, ता. 20 : रत्नागिरी जिल्हातील शेतकऱ्यांच्या गंभीर प्रश्नाबाबत भारतीय किसान संघाच्या वतीने विविध मागण्यासाठी दिनांक २५ मार्च रोजी धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. याबाबत जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात येणार आहे. Indian Kisan Sangh

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे. यामध्ये १ ) आंबा व काजू पिक नुकसानीची तातडीने पाहणी करून शेतकऱ्यांना थेट बँक खात्यामध्ये मदत मिळावी. २) आंबा व काजू पिक विमा तसेच इतर पिकांच्या हवामानातील ट्रिगर पॉईट मध्ये बदल तसेच पिक विमा कालावधी हा विमा हप्ता भरल्यापासून पुढील हप्त्यापर्यंत मिळावा. ३) आंब्या प्रमाणे सुपारी, मसाला पिक यांना पिक विमा मिळावा. ४) मंजूर सोलर पंप तातडीने उभारणी तसेच सोलार शेती पंप सक्तीचा न करता शेतकऱ्यांच्या मागणीनुसार एक फेज व थ्री फेज शेती वीज जोडणी द्यावी, तसेच सोलर पंपाची सबसिडी शेतकऱ्याला देण्यात यावी. ५) अन्नसुरक्षा कायद्यांतर्गत तसेच स्वतंत्र भारताचा नागरिक म्हणून भयमुक्त शेतीचा अधिकार यासाठी शेतीला वन्य प्राण्यांचा होणारा उपद्रव थांबविण्यासाठी परिणामकारक उपाययोजना करावी. ६) ई-पिक अँप (DCS version 4.0) मध्ये असणाऱ्या तांत्रिक त्रुटी व त्याचे होत असलेले दुष्परिणाम या पासून शेतकऱ्यांना दिलासा मिळावा. ७) कोकणातील भौगोलिक परिस्थिती नुसार शासनाच्या विविध योजनामध्ये आवश्यक तो बदल करावा. ८) जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांच्या नादुरुस्त सिंचन व्यवस्थांची तातडीने दुरुस्ती होऊन शेतकऱ्यांना सिंचन करण्यास सहाय्यभूत करावी तसेच नवीन स्त्रोत निर्माण करून सिंचन क्षमता वाढवावी. Indian Kisan Sangh
तरी “शेतकऱ्यांनी स्वतःचे प्रश्न सोडविण्यासाठी भारतीय किसान संघाच्या वतीने स्वतः नेतृत्व करण्यासाठी मोर्च्यात मोठ्या संखेने सहभागी व्यावे” असे आवाहन रत्नागिरी जिल्हा मंत्री श्री धनंजय श्रीविजय जोशी (संपर्क क्र.७४९९६९०२७४) यांनी केले आहे. Indian Kisan Sangh
