गुहागर, ता. 16 : कृषीभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्थेद्वारे संचलित गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालय आणि जिजामाता महिला कृषी महाविद्यालयात, भारताचा ७९ वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात, स्वातंत्र्य संग्रामात आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या ज्ञात-अज्ञात वीरांना आदरांजली वाहिली. Independence Day Celebration in Agriculture College

कृषीभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्थेच्या संचालिका मा. सौ. अंजलीताई तानाजीराव चोरगे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या नंतर राष्ट्रगीत गाऊन राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली. या स्वातंत्र्याचे महत्त्व आपण जपायला हवे आणि एक जबाबदार नागरिक म्हणून देशाच्या विकासासाठी प्रयत्न करायला हवेत. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत सादर करून उपस्थितांमध्ये देशभक्तीची भावना जागृत केली. कार्यक्रमाच्या शेवटी मिठाई वाटून स्वातंत्र्यदिनाचा आनंद द्विगुणीत करण्यात आला. या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम आणि सामाजिक जबाबदारीची भावना अधिक दृढ झाली. Independence Day Celebration in Agriculture College
या कार्यक्रमासाठी कृषीभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. निखिल चोरगे, संचालिका मा. सौ. अंजलीताई तानाजीराव चोरगे, गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संकेत कदम ,जिजामाता महिला कृषी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शमिका चोरगे, उपप्राचार्य श्री. बाळासाहेब सूर्यवंशी तसेच सर्व प्राध्यापक व विद्यार्थी या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. Independence Day Celebration in Agriculture College