गुहागर, ता. 30 तालुक्यातील रेवानदी ते पिंपळवट रस्त्याचे उद्घाटन उद्या रविवार दि.३१ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वा. गुहागरचे आमदार व शिवसेना नेते भास्कर जाधव व रत्नागिरी जिल्हा परिषद माजी अध्यक्ष विक्रांत जाधव यांच्या शुभहस्ते करण्यात येणार आहे. तरी या कार्यक्रमासाठी सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन पिंपळवट ग्रामस्थ विकास मंडळ-पिंपळवट मुंबई अध्यक्ष, हरिश गोताड, मुंबई उपाध्यक्ष दिनेश धावडे , गाव अध्यक्ष प्रभाकर धावडे यांनी केले आहे. Inauguration of Rewa River to Pimpalvat road

या उद्घाटन कार्यक्रमासाठी ज्येष्ठ समाजसेवक विनायक मुळे, शिवसेना गुहागर तालुकाप्रमुख सचिन बाईत, आरे वाकी पिंपळवट ग्रामपंचायत सरपंच समीत घाणेकर, उपसरपंच विठ्ठल धावडे, पाटपन्हाळे ग्रामपंचायत सरपंच विजय तेलगडे, खामशेत ग्रामपंचायत सरपंच मंगेश सोलकर, प्रशासकीय सचिव महेश गोवळकर, शिवसेना महिला विभाग प्रमुख सिद्धी सुर्वे, शिवसेना विभाग प्रमुख शरद यादव, ज्येष्ठ समाजसेवक नरेश धावडे, शिवसेना शाखाप्रमुख पांडुरंग सोलकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. Inauguration of Rewa River to Pimpalvat road