कोकणातील ग्राहकांसाठी मोठी सुविधा
गुहागर, ता. 18 : कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील ह्युंदाई मोटरचे प्रमुख ऑटोमोबाइल डीलर माई ह्युंदाईने कोकण भागातील ग्राहकांसाठी आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. कंपनीच्या २७ वर्षांच्या अखंडित सेवेच्या पार्श्वभूमीवर दापोली येथे नवीन शोरूमचे उद्घाटन गुरुवार दिनांक १९ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता संपन्न होणार आहे. Inauguration of Mai Hyundai’s new showroom
माई हुंदाई ही रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली यांसह कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात १२ शाखांसह कार्यरत आहे. दापोलीतील माई ह्युंदाईची १३ वी शाखा काळकाई कोंड, दापोली- खेड रोड येथे उभारले गेली आहे. येथून दापोली, मंडणगड, गुहागर आणि खेड तालुक्यातील हुंडई ग्राहकांसाठी सेवा देणं सोयीस्कर ठरणार आहे. Inauguration of Mai Hyundai’s new showroom

उद्घाटन समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. जयवंत एस. जालगावकर (चेअरमन, दापोली अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक), श्री. देवेश कुमार (रिजनल सेल्स हेड, हुंडई मोटर इंडिया लि.), श्री. मोहम्मदजावेद बिजनोरी (टेरिटरी सेल्स मॅनेजर, रूरल सेल्स, हुंडई मोटर इंडिया) आणि श्री. वरुण शाह (टेरिटरी सेल्स मॅनेजर, हुंडई मोटर इंडिया) उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह स्थानिक मान्यवर उपस्थित राहतील. माई ह्युंदाईच्या वतीने मॅनेजिंग डायरेक्टर तेज घाटगे, डायरेक्टर दिग्विजय राजेभोसले, जनरल मॅनेजर विशाल वडेर, सेल्स हेड समीर सुर्वे प्रमुख पाहुणे तसंच ग्राहकांचं स्वागत करतील. Inauguration of Mai Hyundai’s new showroom
माई हुंदाईचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे २७ वर्षांची अखंडित ग्राहकाभिमुख सेवा. याच पाठबळावर माई ह्युंदाईला विभागीय पातळीवर तसेच राज्य व राष्ट्रीय पातळीवर अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. भारतातील जवळपास सातशे डीलरशिप्स मध्ये “चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स” पुरस्कार मिळवणारी या भागातील माई ह्युंदाई ही एकमेव डीलरशिप आहे. दापोली हे कोकणाचे ‘महाबळेश्वर’ म्हणून ओळखले जाणारे निसर्गरम्य ठिकाण असून येथील नवीन शोरूममुळे स्थानिक आणि पर्यटक ग्राहकांना हुंदाई वाहनांची खरेदी आणि सेवा अधिक सुलभ होईल. Inauguration of Mai Hyundai’s new showroom
सध्या ह्युंदाईच्या विविध मॉडेल्सवर अनेक योजना सुरू आहेत. शिवाय कोणत्याही ब्रँडच्या जुन्या कार्स बाय बॅक करण्यासह नवीन कार्ससाठी आकर्षक व्याजदरात वित्तपुरवठासुद्धा माई ह्युंदाईच्या माध्यमातून केला जातो. दापोली व परिसरातील ग्राहकांनी या योजनांचा जरूर लाभ घ्यावा, असं आवाहन मॅनेजिंग डायरेक्टर तेज घाटगे यांनी केलं आहे. Inauguration of Mai Hyundai’s new showroom
