• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
20 March 2026, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

“अवेरे ज्ञान प्रबोधिनी हॉलचे” सभापती पोळेकर यांच्या हस्ते उदघाट्न

by Guhagar News
March 20, 2026
in Guhagar
57 1
0
Inauguration of "Avere Dnyan Prabodhini Hall"
113
SHARES
322
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 20 :  तालुक्यातील शृंगारतळी येथील वकील सुशील अवेरे यांच्या “अवेरे ज्ञान प्रबोधिनी हॉलचे” उदघाट्न सभापती प्रणव पोळेकर यांच्या हस्ते पार पडले. स्थानिकांचं स्थलांतर थांबवून छोटे छोटे उद्योग साखळी तयार करणेसाठी आवश्यक छोटे छोटे ज्ञान सत्र व ट्रेनिंग साठी माफक दारामध्ये दशभुजा सोशल फाउंडेशनचे वतीने वकील सुशील सुगंधा गणपत अवेरे यांनी शृंगारतळी मध्ये “अवेरे ज्ञानप्रबोधिनी” सुरू केले आहे. Inauguration of “Avere Dnyan Prabodhini Hall”

Inauguration of "Avere Dnyan Prabodhini Hall"

या हॉलचे उदघाट्न गुहागर पंचायत समितीचे सभापती मा.प्रणवजी पोळेकर यांच्या हस्ते गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर गुरुवार दि.१९ मार्च रोजी करण्यात आले. या निमित्ताने गुहागर तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांचे सत्कार-सन्मान करण्यात आले. तसेच विविध क्षेत्रातील १९ मान्यवरांचा सत्कार करण्यात आले. Inauguration of “Avere Dnyan Prabodhini Hall”

Inauguration of "Avere Dnyan Prabodhini Hall"

त्यामध्ये नवनियुक्त सभापती मा.प्रणवजी पोळेकर, जिल्हा परिषद सदस्य मा. सौ.नेत्रा ताई ठाकूर, मा. श्री.महेशजी नाटेकर साहेब, मा.प्रमोदशेठ गांधी, पंचायत समिती सदस्य मा. श्री.गौरवजी वेल्हाळ, शिवसेना गुहागर तालुका प्रमुख मा.दीपक कनगुटकर साहेब, कृपा हेअर टॉनिक मा.राजनभाई दळी, व्यापारी संघटना अध्यक्ष मा. श्री अजित शेठ बेलवलकर, मा. पत्रकार दिनेश चव्हाण, मा.गणेश किर्वे, सरपंच मा.विजय तेलगडे,  वकील संतोष आग्रे, डॉ. राजेंद्र पवार, स्वीकृत नगर सेवक मा.अमरदीप परचुरे, मा. गटनेते नगरसेवक अमोल गोयथळे, अमर कॅशुचे मालक मा.अमरनाथ मोहिते, अशोक मोहिते, माजी सभापती मा. सुनील पवार, निवोशी पालशेत माजी तंटा मुक्त अध्यक्ष अर्जुन अवेरे, मा.दिनेश सोलकर, मा. लवेश सोलकर, वकील प्रसाद जांगळे, रियाज ठाकूर, मा. दिगंबर मेस्त्री, पाटील या मान्यवरांचा सन्मान -सत्कार करण्यात आला. Inauguration of “Avere Dnyan Prabodhini Hall”

Inauguration of "Avere Dnyan Prabodhini Hall"

सर्व मान्यवरांनी दशभुजा सोशल फाउंडेशन च्या सर्व उपक्रमाना मदत करण्याचे आश्वासन दिले. या कार्यक्रममध्ये मान्यवर प्रणव पोळेकर, महेश नाटेकर, अजित शेठ बेलवलकर, सुनील पवार, राजन भाई दळी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्याचप्रमाणे सर्व मान्यवर यांनी अवेरे कुटुंब यांचा सन्मान केला. प्रास्ताविक वकील सुशील अवेरे यांनी केल तर सूत्रसंचालन अमर मोहिते यांनी केले. Inauguration of “Avere Dnyan Prabodhini Hall”

Tags: GuhagarGuhagar NewsInauguration of "Avere Dnyan Prabodhini Hall"Latest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share45SendTweet28
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.