• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
13 April 2026, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

बेकायदा शस्त्र प्रकरणातील आरोपीची जामिनावर सुटका

by Guhagar News
March 18, 2026
in Guhagar
158 1
0
310
SHARES
885
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 18 : गुहागर पोलीस ठाण्यात भारतीय शस्त्र अधिनियम कलम ३ व २५ अन्वये दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपी संजय श्रीधर फुणगुस्कर रा वेलदूर नवानगर ता गुहागर याची गुहागर न्यायालयाने जामिनावर सुटका करण्याचा आदेश दिला आहे. न्यायालयाने आरोपीस रुपये १५,०००/- च्या जामिनावर मुक्त करण्याचा आदेश दिला. Illegal Arms Case

या प्रकरणात पोलिसांनी आरोपीस ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडून एक गावठी बंदूक व जिवंत काडतुसे जप्त केल्याचा दावा करत न्यायालयाकडे पोलीस कोठडीची मागणी केली होती. मात्र आरोपीतर्फे अ‍ॅड. अलंकार विखारे यांनी न्यायालयासमोर युक्तिवाद करत पोलिस कोठडीची आवश्यकता नसल्याचे मांडले. आरोपीकडून जप्त करण्यात आलेला मुद्देमाल आधीच पोलिसांच्या ताब्यात असल्याने पुढील तपासासाठी आरोपीची पोलीस कोठडी आवश्यक नसल्याचे त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. Illegal Arms Case

दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने आरोपीस रुपये १५,०००/- च्या जामिनावर मुक्त करण्याचा आदेश दिला. सदर प्रकरणात आरोपीतर्फे अ‍ॅड. अलंकार विखारे यांनी बाजू मांडली असून त्यांना त्यांचे वरिष्ठ अ‍ॅड. संकेत साळवी यांचे मार्गदर्शन लाभले. Illegal Arms Case

Tags: GuhagarGuhagar NewsIllegal Arms CaseLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share124SendTweet78
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.