गुहागर : तालुक्यातील कोतळूक उदमेवाडी येथील समीर ओक यांच्या सीएससी सेंटर येथे एचपी गॅस अधिकृत सुविधा केंद्र सुरू झाले आहे. या सुविधा केंद्राचे उद्घाटन कोतळूकच्या सरपंच सौ. उर्मिला गोरिवले यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. सुविधा केंद्र सुरु करण्यासाठी चंद्रभागा गॅस एजन्सीने महत्त्वपूर्ण सहकार्य लाभले. (HP GAS Help Center, Kotluk)
कोतळूक गावात घरगुती गॅस वापरणारे अनेक ग्राहक आहेत. त्यांना आपल्या अडचणी सोडविण्यासाठी यापूर्वी गुहागरला चंद्रभागा गॅस एजन्सीमध्ये यावे लागत होते. विजयादशमीच्या मुहूर्तावर कोतळूकमध्ये एचपी गॅसचे अधिकृत सुविधा केंद्र सुरु झाले आहे. या सुविधा केंद्रातून नवीन गॅस कनेक्शन, प्रधानमंत्री उज्वला योजना २ चे रजिस्ट्रेशन, गॅस बुकींग तसेच गॅसविषयीच्या इतर सुविधा ग्राहकांना गावातच मिळणार आहेत. गॅसची ही सुविधा गावातच उपलब्ध होत असल्याने अचानक लागणारे सिलेंडर, बुकींग याविषयी येणाऱ्या अडचणी दूर होणार आहेत. अशी माहिती केंद्र चालक समीर ओक यांनी दिली.
उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी चंद्रभागा गॅस एजन्सी गुहागरचे श्रमिक भाटकर, ग्रामपंचायत सदस्य सचिन ओक, उदमेवाडी अध्यक्ष अनंत चव्हाण, माजी अध्यक्ष दिलिप मोहिते, आबा आरेकर, मुकुंद ओक, शिरीष ओक, नरेश बागकर, मोहन पारकर, निलेश आडाव, मंदार गुहागरकर, संतोष गोरिवले, परसू बारगोडे, गंगाराम बारगोडे, रमेश गोरिवले, अनिल मोहिते, पराग नार्वेकर,रूपेश बेलवलकर, सौ.मेधा ओक, दिपाली ओक, रश्मी गुहागरकर आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.