गुहागर, ता. 10 : शृंगारतळी येथे जागतिक महिला दिन व आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी दिनानिमित्त महिला शेतकरी मेळावा संपन्न झाला. या मेळाव्यात ऑरगॅनिक प्रोड्युसर कंपनी मार्फत कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पाच महिलांचा गौरव करण्यात आला. या मेळाव्यात महिलांना उद्योजक बनण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले. Honoring women working in agriculture
शृंगारतळी येथील ग्रामपंचायत पाटपन्हाळे येथे जागतिक महिला दिन व आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी दिनानिमित्त महिला शेतकरी मेळावा संपन्न झाला. य़ाचे आयोजन गुहागर ऑरगॅनिक प्रोड्युसर कंपनी लिमिटेड, Techo Serve, तालुका कृषी अधिकारी आणि गुहागर कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्या संयुक्त विद्यमानाने करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक सौ. रिया सुयोग विचारे उपस्थित होत्या. Honoring women working in agriculture

यावेळी ऑरगॅनिक प्रोड्युसर कंपनी मार्फत कृषी क्षेत्रात व कंपनी सहकार्यात उल्लेखनीय कामगिरी केली अशा पाच महिलांचा गौरव करण्यात आला. यामध्ये धनश्री धनश्याम मांजरेकर, नीता अनंत दाबके, नम्रता सुनील भेकरे, गौरी शिरीष खरे, संजना संतोष खेतले यांचा समावेश होता. Honoring women working in agriculture
मेळाव्यामध्ये मंदार जोशी यांनी महिलांना परसबागेचे महत्त्व सांगितले. तालुका कृषी अधिकारी क्षीरसागर सर यांनी कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली. कार्यक्रमाच्या प्रमुख मार्गदर्शक रिया विचारे यांनी कोकणातील प्रक्रिया उद्योगामध्ये अनेक संधीं आहेत. वाढत्या पर्यटनामुळे आपल्याकडे बाहेरून अनेक मंडळी येत असतात. त्यामुळे कोकम सरबत, आमरस, करवंद लोणच यादी कोकणातील अनेक उत्पादनांना मागणी वाढते आहे. त्यामुळे कोकणातील महिलांना शेतमालावर प्रक्रिया करण्याच्या अनेक उद्योगांमध्ये संधी आहेत. त्याचा लाभ घेवून गुहागरमध्ये महिला उद्योजिका तयार व्हाव्यात. असे विचार मांडले. Honoring women working in agriculture

सत्कार मूर्ती निशा दाबके यांनी जयपूर येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय मसाला पीक व उत्पादने परिषदेची माहिती महिलांना दिली. तर आर्थिक सल्लागार गजानन जोशी यांनी महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी गुंतवणूक व बचत करण्याचे योग्य मार्ग या विषयावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाची प्रस्तावना राकेश ठोंबरे तर मान्यवरांची आभार ठाकरे सर यांनी मानले. या कार्यक्रमाला पंचक्रोशीतील बचत गटाच्या महिला उपस्थित होत्या. Honoring women working in agriculture
