• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
28 June 2025, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

गुहागरमध्ये मुसळधार पाऊस

by Mayuresh Patnakar
October 1, 2023
in Guhagar
302 3
0
Heavy rain in Guhagar
593
SHARES
1.7k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 01 : तालुक्यात गणेशोत्सवापासून पडणाऱ्या पावसाने गेल्या दोन दिवसात जोर धरला आहे. शनिवार सायंकाळ पासून गुहागर तालुक्यात सर्वत्र मुसळधार पावसाला सुरवात झाली आहे. आज (रविवार ता. 01)  सकाळपासून पडणाऱ्या पावसाने तालुक्याला झोडपून काढले आहे. यामुळे हळव्या भातशेतीचे खूपच नुकसान होणार आहे. Heavy rain in Guhagar

Heavy rain in Guhagar

अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळं गेले दोन दिवस मुसळधार पावसाला सुरवात झाली. वाऱ्याचा वेगही वाढला असून वातावरण अंधारमय आहे.  त्यामुळं अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला आहे. नदीनाल्यांना पुन्हा पूर आला आहे.वादळी वाऱ्यामुळं ठिकठिकाणी नुकसानही झाले आहे. शनिवार रात्रभर पाऊस पडल्याचा परिणाम रस्त्यावरील वाहतूकीवर झाला आहे. वादळी वाऱ्यामुळे मच्छिमारांनी आपल्या नौका बंदरात उभ्या करुन ठेवल्या आहेत. हळवे भात दिवाळी पर्यंत तयार होते, परंतू वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसामुळे पसवलेला दाणा भरत नाही. यामुळे भातपिकाचे नूकसान होणार या चिंतेत शेतकरी आहे. Heavy rain in Guhagar

Heavy rain in Guhagar

कोकणातील अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडत असल्याने समुद्राला उधाण आलं आहे. यामुळे कोकणातील जनजीवन विस्कळीत होत असल्याचं चित्र निर्माण झालं आहे. Heavy rain in Guhagar

Tags: GuhagarGuhagar NewsHeavy Rain in GuhagarLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share237SendTweet148
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.