गुहागर, ता. 07 : गोमंतक साहित्य सेवक मंडळ पणजी प्रतिवर्षी विविध प्रकारची साहित्य निर्मिती करणाऱ्या गोवा आणि महाराष्ट्रातील साहित्यिक यांना स्वर्गीय ब्रह्मराज देसाई स्मृती पुरस्कार प्रदान करत असते. सन 2026 चे पुरस्कार वितरण सोहळा गोवा येथील सांखळी रविंद्र भवनात संपन्न झाला. Heavenly Brahmraj Desai Memorial Award
महाराष्ट्र मधून कवी राष्ट्रपाल सावंत यांच्या गतस्मृतीची गजबज, गणेश भाकरे याचं थेंबा थेंबाची कहाणी तर गोव्यातील अपूर्वा ग्रामोपाध्ये याचं आभास, बबिता नार्वेकर याचं शब्द प्रज्ञा,रेशम झारापकर यांचं रेशम गाठ अशा पाच साहित्यिक यांचा सन्मान करण्यात आला. साहित्यिक राष्ट्रपाल सावंत यांच्या मनोगताला गोवेकर मंडळीनी दाद दिली, चंद्रकांत गावस यांनी गतस्मृतीची गजबज, आभास या पुस्तकाबद्दल माहिती दिली, तर रमेश वंसकर यांनी अन्य पुस्तकं बद्दल मनोगत व्यक्त केले. Heavenly Brahmraj Desai Memorial Award
या कार्यक्रमाला विविध स्तरातील मान्यवर साहित्यिक होते. पांडुरंग कुर्टिकर अध्यक्ष गोवा स्टेट को ऑप बँक, यांच्या अध्यक्षतेत कालिदास गावस, साहित्यिक गजानन देसाई, रमेश वंसकर अध्यक्ष गोमंतक साहित्य सेवक मंडळ पणजी, साहित्यिक चंद्रकांत गाव, विठ्ठल गावस उपस्थितीत होते. दीप प्रज्वलन, स्वागत, पुस्तकं परीक्षण, लेखक परिचय, पुरस्कार वितरण, पुरस्काराचे स्वरूप सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र, रक्कम पुष्प होते. Heavenly Brahmraj Desai Memorial Award
