• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
1 December 2025, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

आबलोली ग्रामपंचायतर्फे स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान

by Guhagar News
September 24, 2025
in Old News
66 1
0
Healthy women, strong family
131
SHARES
373
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

संदेश कदम, आबलोली
गुहागर, ता. 24 : तालुक्यातील निर्मल ग्रामपंचायत आबलोली यांच्या संयुक्त विद्यमाने मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत “स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान” उत्साहात संपन्न झाले. या अभियानाचे उदघाटन सरपंच सौ. वैष्णवी वैभव नेटके यांचे हस्ते करण्यात आले. Healthy women, strong family

यावेळी महिला आणि बालकांसाठी विशेष आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात महिलांमध्ये जनजागृती करून महिलांनी कशाप्रकारे आरोग्याची काळजी घ्यावी याबद्दल समुपदेशन करण्यात आले. या अभियानामध्ये महिलांच्या तपासणी उच्च रक्तदाब, मधुमेह, कर्करोग तपासणी क्षयरोग, रक्ताक्षय व सिकल सेल स्क्रीनिंग, गरोदर मातांची तपासणी व समुपदेशन करून लसीकरण सेवा, मासिक पाळी स्वच्छता मार्गदर्शन, किशोरवयीन मुलींचे समुपदेशन, पूरक आहार व आरोग्यदायी आहार पद्धती याबाबत माहिती देण्यात आली. Healthy women, strong family

Healthy women, strong family

यावेळी एकात्मिक बाल विकास योजना प्रकल्प गुहागर बीट आबलोली या बीट मधील आबलोली, खोडदे, मासू गावातील अंगणवाडी सेविका अक्षता मोहिते, दामिनी पवार, संजीवनी नाचरे, प्रिया कदम, रिया रेपाळ, श्वेता  गुरव, जयश्री साळवी, ज्योती निर्मल स्नेहा आंब्रे यांनी बनवून आणलेल्या पाककला, पाककृती महोत्सवाचे प्रदर्शनही उत्साहात संपन्न झाले. Healthy women, strong family

यावेळी  स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान 2025 या अभियानात प्राथमिक केंद्र आबलोलीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशिक पांडे,  ओप्लोथँमिक  ऑफिसर  ओम  कटक, आरोग्य निरीक्षक महेश जांभळे, आरोग्य सेवक गोविंद केंद्रे, आरोग्य सेविका चंदनी वासावे, समुदाय आरोग्य अधिकारी नयना शेळके, महेंद्र गाडेकर, आरोग्य सेविका मनस्वी शिंदे, आरोग्य सेवक सिद्धार्थ कोकरे, आशा गटप्रवर्तक स्वाती साळवी, विशाखा कदम, सानिध्या रेपाळ, मधुरा साळवी, पूजा निवाते, रश्मी साळवी, आरोही मास्कर आदी. कर्मचारी उपस्थित होते. या शिबिराचा  आबलोली  गावातील   महिलांनी, मुलींनी आणि लहान मुलांनी मोफत लाभ घेतला. Healthy women, strong family

Jakhadi Festival in Guhagar

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून तालुका आरोग्य अधिकारी डॉ.घनश्याम जांगिड, उपसरपंच अक्षय पागडे, ग्रामविस्तार अधिकारी बाबुराव सूर्यवंशी, तंटामुक्ती अध्यक्ष आप्पा कदम, माजी सरपंच प्रमेय आर्यमाने,  पोलीस पाटील महेश भाटकर, प्राथमिक केंद्र आबलोलीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशिक पांडे, ग्रामपंचायत सदस्य ऋषिकेश बाईत, उमेश पवार,सौं. पूजा कारेकर,सौं. शैला पालशेतकर, श्रीमती. नम्रता निमुणकर, बचत गटाच्या सीआरपी सौं. मीनल कदम, एकात्मिक बालविकास योजना प्रकल्प आबलोली बीट पर्यवेक्षिका रसिका माटल, यांच्यासह  अंगणवाडी सेविका, अशा स्वयंसेविका आणि बचत गटाच्या महिला बहुसंख्येने उपस्थित होत्या. Healthy women, strong family

Tags: GuhagarGuhagar NewsHealthy womenLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarstrong familyटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share52SendTweet33
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.