• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
17 October 2026, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

गुहागरमध्ये सेवा संकल्प अभियानांतर्गत आरोग्य शिबिर

by Manoj Bavdhankar
October 17, 2026
in Guhagar
23 0
0
Health camp under Seva Sankalp Abhiyan
44
SHARES
127
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 17 : महाराष्ट्र शासनाच्या ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत ‘सेवा माझे योगदान’ या उपक्रमांतर्गत स्वयंसिद्धा महिला नागरी पतसंस्था मर्यादित, गुहागर आणि तालुका अधिकारी श्रेणी एक सहकारी संस्था, गुहागर यांच्या संयुक्त विद्यमाने १४ ऑक्टोबर रोजी व्याडेश्वर देवस्थानच्या परशुराम सभागृहात मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात ५० नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. Health camp under Seva Sankalp Abhiyan

शिबिराचे उद्घाटन गुहागरच्या नगराध्यक्षा नीताताई मालप आणि संस्थेच्या अध्यक्षा स्नेहा परचुरे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व प्रतिमापूजन करून करण्यात आले. यावेळी गुहागर ग्रामीण रुग्णालयातील अनुश्री पोलाजी, रसिका पवार आणि दीक्षा मोहिते उपस्थित होत्या. Health camp under Seva Sankalp Abhiyan

अनुश्री पोलाजी यांनी उपस्थित महिला व सभासदांना वयाच्या ३० वर्षांनंतर नियमित आरोग्य तपासणी करण्याचे महत्त्व पटवून दिले. तसेच ग्रामीण रुग्णालयात उपलब्ध असलेल्या आरोग्य सुविधांची माहिती देऊन आवश्यकतेनुसार पुढील तपासणी व उपचारांसाठी रुग्णालयात येण्याचे आवाहन केले. या शिबिरात उपस्थित महिला व नागरिकांची रक्तदाब, रक्तातील साखर, ईसीजी आणि सीबीसी या तपासण्या मोफत करण्यात आल्या. Health camp under Seva Sankalp Abhiyan

संस्थेच्या अध्यक्षा स्नेहा परचुरे यांनी सभासदांशी संवाद साधत संस्थेच्या कार्याची माहिती दिली. संस्थेच्या गेल्या २५ वर्षांतील वाटचालीचाही त्यांनी आढावा घेतला. नगराध्यक्षा नीताताई मालप यांनी अशा आरोग्य शिबिरांची आवश्यकता अधोरेखित केली. तसेच महिलांनी शासनाच्या आरोग्यविषयक सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आसावरी ओक यांनी केले. यावेळी नगरसेविका उपस्थित होत्या. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी गुहागर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बळवंत आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे सहकार्य लाभले. Health camp under Seva Sankalp Abhiyan

Tags: GuhagarGuhagar NewsHealth camp under Seva Sankalp AbhiyanLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share18SendTweet11
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.