• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
30 September 2026, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

प्रमोद गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यासाठी शिबिर

by Mayuresh Patnakar
September 29, 2026
in Health
37 0
0
Health Camp for Students
72
SHARES
207
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 29 : तालुक्यातील तळवली येथील न्यू इंग्लिश स्कूल येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष व जिल्हा परिषद सदस्य प्रमोद सिताराम गांधी यांच्या वतीने मोफत आरोग्य व नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. चिपळूण येथील रुग्णसेवक आणि सामाजिक कार्यकर्ते शशिकांत चव्हाण यांनी उत्कृष्ट नियोजन व  एसएमएस हॉस्पिटल, चिपळूण यांच्या सहकार्याने शालेय विद्यार्थ्यांसाठी हे शिबिर घेण्यात आले होते. Health Camp for Students

Health Camp for Students

या शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांकडून 300 विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी आणि 50 विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी करून आवश्यक वैद्यकीय सल्ला दिला. रक्तदाब, रक्तातील साखर, डोळे व दातांची तपासणी तसेच ईसीजी या सुविधा मोफत उपलब्ध करून देण्यात आल्या. औषधांचेही मोफत वाटप केले गेले. सुरेंद्र ऑप्टिकल, मुंबई यांच्या सहकार्याने नेत्र तपासणीची विशेष सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्यासोबतच त्यांच्या दैनंदिन जीवन शैलीकडेही  लक्ष देत आहार, व्यायाम आणि आरोग्यदायी जीवनशैलीबाबत तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात आले. Health Camp for Students

Health Camp for Students

या शिबिराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना (MJPJAY) अंतर्गत पात्र रुग्णांना पुढील उपचारांसाठी मार्गदर्शन केले. हृदयविकार, मूत्रपिंड, पित्ताशय, कॅन्सर, हर्निया आदी आजारांसाठी आवश्यक उपचार व शस्त्रक्रियेबाबत पुढील प्रक्रिया समजावून सांगून  विद्यार्थ्यांच्या आरोग्याची तपासणी, नागरिकांना आरोग्यविषयक मार्गदर्शन आणि गरजू रुग्णांना पुढील उपचारांची दिशा मिळाली. Health Camp for Students

Health Camp for Students

या कार्यक्रमाला मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष विनोद जानवळकर, गुहागरचे तालुकाध्यक्ष सुनील हळदणकर, विद्यार्थी सेनेचे तालुकाध्यक्ष प्रथमेश रायकर, उप तालुकाध्यक्ष स्वप्निल जाधव, उप तालुकाध्यक्ष अमित खांडेकर, मुंढरचे शाखाध्यक्ष सुजित गांधी, वडदचे शाखा अध्यक्ष प्राणेश पिंपळकर, महाराष्ट्र सैनिक सोहम गांधी, सांस्कृतिक विभाग प्रमुख राहुल जाधव, ज्येष्ठ शिवसैनिक विनायकराव मुळ्ये, दीलीप आग्रे, महाराष्ट्र सैनिक विराज गांधी, सागर शिरगावकर, न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय तळवलीचे प्राचार्य महावीर थरकार, प्रा.गवळी सर,प्रा.संदेश देवरुखकर,प्रा. अमोल जड्याळ,केळस्कर सर, एसएमएस हॉस्पिटल चिपळूणचे डॉक्टर कैलास नागरगोजे, मेडिकल ऑफिसर अजय शिंदे, एलएबी टेक्निकल स्वप्निल बाईत, समर्थ अंबेडे, धर्मश्री कदम,  प्रिया मांडवकर, साक्षी मोहिते, वैभव बांगर,  सुरेंद्र ऑप्टिकल्स दादर मुंबईचे ऑक्टोमॅस्ट्रीस्ट  सुरेंद्र निकम, नेत्रतज्ञ दर्शना जाधव, गौरव निकम निर्मला मडीये आदी. मान्यवर उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी प्रमोद गांधी यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी प्राध्यापक अमोल जड्याळ यांनी सूत्रसंचालन केले तर  केळस्कर सर यांनी सर्वांचे आभार मानले. Health Camp for Students

Tags: GuhagarGuhagar NewsHealth Camp for StudentsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share29SendTweet18
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.