• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
16 May 2025, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

पालशेत येथे आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

by Ganesh Dhanawade
October 29, 2023
in Guhagar
213 2
0
Health camp completed at Palshet
419
SHARES
1.2k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

आरोग्य हीच आपली खरी संपत्ती; महेश वेल्हाळ

गुहागर, ता. 29 : आरोग्य हीच आपली खरी संपत्ती असून या शिबिराच्या माध्यमातून मानवसेवा घडत असल्याचे प्रतिपादन पालशेत ग्रामपंचायतीचे उपसरपंच महेश वेल्हाळ यांनी केले. पालशेत ग्रामस्थ व अपरांत हॉस्पिटल चिपळूण यांच्या संयुक्त विद्यमाने येथील सुभाष विलणकर यांच्या निवास्थानी मोफत महाआरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. शिबिरात सुमारे १६९ रुग्णांची तपासणी करण्यात आली. Health camp completed at Palshet

Health camp completed at Palshet

या शिबिराचे उद्घाटन उपसरपंच महेश वेल्हाळ यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले. यावेळी धन्वंतरी पूजन आणि छ. शिवाजी महाराजांच्या अर्ध पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आले. पालशेत पंचक्रोशीतील गरजू रुग्णांना चिपळूण सारख्या ठिकाणी जावून आरोग्य तपासण्या कराव्या लागतात. यासाठी मानसिक त्रास आणि आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. याची दखल घेऊन सर्व रुग्णांची आरोग्य तपासणी व औषधोपचार, इसीजी तपासणी, शरीरातील कॅल्शियम प्रमाण, रक्तदाब, ऑक्सिजन लेवल, यासारख्या तपासण्या करण्यात आल्या. एवढेच नव्हे तर पुढील उपचारासाठी हॉस्पिटल मार्फत १० ते २० टक्के कुपन रुग्णांना वाटप करण्यात आले. Health camp completed at Palshet

Health camp completed at Palshet

या शिबिरासाठी हेदवी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. कदम यांचे विशेष सहकार्य लाभले. या शिबिराला डॉ. विखारे, अशोक चव्हाण, बजरंग दलाचे जिल्हा समन्वयक बंटी नागवेकर, हरीश वेल्हाळ, राजू नरवणकर, नितीन कनगुटकर, मनोहर पाटील, योगेश वायंगणकर, साहिल वासावे, सुधांश आरेकर, अक्षय पटेकर, विशाल डोर्लेकर, मीनार पाटील, नरेंद्र नार्वेकर, दीपराज पाटील, मयूर पाटील, ओमकार पाटील, अनुज पाटील, निखिल पाटील, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. साबळे आदी उपस्थित होते. Health camp completed at Palshet

Tags: GuhagarGuhagar NewsHealth camp completed at PalshetLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share168SendTweet105
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.