• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
3 March 2026, Tuesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

परचुरी येथे हाजी मुस्तफा शहाबाबांचा उरूस

by Guhagar News
March 2, 2026
in Guhagar
47 1
0
Haji Mustafa Shahbaba's Urus at Parchuri
93
SHARES
266
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 02 : तालुक्यातील परचुरी गावामध्ये दाभोळ खाडीच्या किनारपट्टीवर वाशिष्ठीच्या काठावर वसलेले सुफीपीर हजरत हाजी मुस्तफा शहाबाबांचा व डावलशहा वलीबाबांचा ८३९ वा उरूस शुक्रवार दिनांक ६ मार्च २०२६ रोजी साजरा करण्यात येणार आहे. ८४६ वर्षापूर्वी बगदादहून दाभोळ खाडीच्या किनारपट्टीवर येवून वसलेल्या बाबांचा उरूस, मोठ्या उत्साही वातावरणात साजरा करण्यात येतो. Haji Mustafa Shahbaba’s Urus at Parchuri

बाबांवर असलेली श्रद्धा व त्यांच्याकडून पूर्ण होणाऱ्या नवसामुळे भाविक सतत येते असतात. गुहागर तालुक्यासह जिल्हातून तसेच इतर ठिकाणहून सर्व धर्मिय हजारो भाविक बाबांच्या उरूसासाठी व संदलासाठी हजेरी लावतात. नवसाला परिपूर्ण करणारे बाबा म्हणून त्यांची ख्याती असल्यामुळे भाविकआता दिवसेंदिवस वाढतच आहे. बाबांच्या उरूसाच्या रात्री सर्व भाविकांना इफतारी व्यवस्था तसेच ७:३० ते १०:३० भोजन ( नियाज) व्यवस्था केलेली आहे. Haji Mustafa Shahbaba’s Urus at Parchuri

तरावी नमाज नंतर रातीब व संदल निघणार आहे. तसेच या ठिकाणी मस्तानीसह लेझीम इत्यादी कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. बाबांचा हा उरूस आनंदात व उत्साहात साजरा करण्यासाठी स्थानिक जमातीचे अध्यक्ष फरिदभाई चोगले व त्यांचे सर्व सहकारी विशेष परिश्रम घेतात. तरी या उरूसाच्या नियाजीचा आणि संदलाचा लाभ सर्व भाविकांनी घ्यावा, असे आवाहन फरिदभाई चोगले व संयोजकांतर्फे करण्यात आले आहे. हाजी बाबांचा उरूस पवित्र रमजान महिन्यात साजरा होत असल्याने रोजेदारांसाठी इफतारी तसेच नियाज (भोजन) व पहाटे ४:०० वाजता दर्गा शरीफवर चादर चढविल्यानंतर सहेरीची (रोजा) व्यवस्था संयोजकांकडून करण्यात आलेली आहे. Haji Mustafa Shahbaba’s Urus at Parchuri

Tags: GuhagarGuhagar NewsHaji Mustafa Shahbaba's Urus at ParchuriLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share37SendTweet23
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.