• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
14 November 2026, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

गुहागरचा सोहम बावधनकर नासा दौऱ्यासाठी अमेरिकेला रवाना

by Manoj Bavdhankar
November 14, 2026
in Guhagar
110 1
0
Guhagar's Soham leaves for America for NASA tour
216
SHARES
616
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 14 : गुहागरचा सुपुत्र सोहम बावधनकर हा नासा (NASA) दौऱ्यासाठी अमेरिकेला रवाना झाला आहे. गुहागर सारख्या छोट्या गावातून या विद्यार्थ्याने नासापर्यंत झेप घेतल्याने संपूर्ण गुहागरमध्ये आनंदाचे आणि अभिमानाचे वातावरण आहे. Guhagar’s Soham leaves for America for NASA tour

सोहमने १२ नोव्हेंबर रोजी रात्री १० वाजता मुंबईहून एमिरेट्सच्या EK 509 विमानाने प्रस्थान केले. दुबईत ४ तास थांबून त्याने EK 219 विमानाने ऑर्लॅंडो गाठले. ऑर्लॅंडो येथील केनेडी स्पेस सेंटर येथे नासाच्या विशेष दौऱ्यात तो सहभागी होणार आहे.

या दौऱ्यात सोहम मियामी, लास वेगास, फ्रेस्नो आणि सॅन फ्रान्सिस्को या शहरांनाही भेट देणार आहे. १६ नोव्हेंबर रोजी ऑर्लॅंडो ते मियामी, १७ नोव्हेंबर रोजी फोर्ट लॉडरडेल – नॅशविल मार्गे लास वेगास, १८ नोव्हेंबर रोजी फ्रेस्नो आणि १९ नोव्हेंबर रोजी सॅन फ्रान्सिस्को असा त्याचा प्रवास असणार आहे. सॅन फ्रान्सिस्को येथे कॅलिफोर्निया स्टेट युनिव्हर्सिटी आणि मॉन्टेरी बे अक्वेरिअमला तो भेट देणार आहे. २३ नोव्हेंबर रोजी सोहम लॉस एंजेलिसहून दुबईमार्गे परतीच्या प्रवासाला निघणार असून २५ नोव्हेंबर रोजी पहाटे मुंबईत दाखल होणार आहे. Guhagar’s Soham leaves for America for NASA tour

सोहमच्या या यशामुळे गुहागरचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर झळकले असून, त्याच्यावर गुहागरवासीयांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. गुहागरच्या तरुणांसाठी सोहम हा प्रेरणादायी ठरला आहे. Guhagar’s Soham leaves for America for NASA tour

Tags: GuhagarGuhagar NewsGuhagar's Soham leaves for America for NASA tourLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share86SendTweet54
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.