गुहागर विजापूर महामार्ग अद्याप अपूर्णावस्थेत ; साईड पट्टीवर चिखलाचे साम्राज्य
गुहागर, ता. 26 : गुहागर – विजापूर महामार्गाचे काम सुरु होऊन बराच कालावधी लोटला. तरी अद्याप हे काम अपूर्णच आहे. त्यातच या वर्षीचा गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. याकरिता गावी येणाऱ्या चाकरमान्यांच्या वाहनांना अपूर्ण चिखलमय रस्त्यामुळे अपघात होण्याची भिती व्यक्त होत आहे. Guhagar Vijapur highway is still incomplete

मोडकाघर पूल ते रामपूर पर्यंत सलग हा रस्ता पूर्ण झाला असला, तरी अनेक ठिकाणी मोऱ्या व पूल अजून अपूर्णावस्थेत आहेत. तर मोडकाघर धरण पुलाच्या पलिकडे पालशेत फाट्या पर्यंत अजून रस्त्याला हातच न लावल्यामुळे या पुलाच्या पलिकडे चिंचोळा मातीने बनविलेला अरुंद रस्ता अजून तसाच आहे. यावरुन फक्त एकेरी वाहतूक सुरु आहे. त्यामुळे खुद्द गुहागर व पालशेत हेदवी तवसाळकडे जाणारी वाहतूक अडथळ्याची बनली आहे. Guhagar Vijapur highway is still incomplete
मोडका घर फाट्यापासून गुहागर शहरापर्यत अद्याप रस्ताच पोचला नसून या ठिकाणच काम मोठ्या प्रमाणावर अपूर्ण आहे . गुहागर शहरात झिरो पॉईंट पर्यंत अजून रस्ता रुंदीकरण व रस्त्यावरील बांधकामे यावर अद्याप निर्णयच झालेला नाही. तर पाटपन्हाळे ते रामपूर पर्यंत अनेक ठिकाणी मोर्या व पूलाची कामें अपूर्ण आहेत. वा सुरु आहेत. या सुरु असलेल्या कामामुळे रस्त्यावर व साईड पट्टीवर संततधार पावसामुळे चिखल साचत असून अनेक ठिकाणी रस्ता निसरडा होऊन वाहन चालकांना वाहन चालविण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. यामुळे काही ठिकाणी अपघातही होत आहेत. Guhagar Vijapur highway is still incomplete

कोविड काळानंतरच्या दोन वर्षांनी यंदाचा गणेशोत्सव येत असून तो निर्बंधमुक्त असल्यामुळे गावी येणाऱ्या चाकरमान्यांची मोठी गर्दी महामार्ग वर होणार आहे. रस्त्याची रुंदी वाढल्यामुळे त्यांच्या वाहनांचा वेगही वाढणार आहे. त्यामुळे रस्त्याच्या सद्या झालेल्या दुरावस्थेमुळे वाहनांच्या सुरक्षेची भिती वाढली आहे. येणाऱ्या गणेशोत्सव काळातली ही भिती लक्षात घेऊन महामार्ग अधिकारी यांनी सतर्कता बाळगून योग्य ती काळजी घेण्याची मागणी होत आहे. Guhagar Vijapur highway is still incomplete
