• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
20 August 2026, Thursday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

गणेशोत्सवापूर्वी गुहागरला मिळणार १० ‘जिजाऊ’

by Mayuresh Patnakar
August 20, 2026
in Guhagar
43 1
0
Guhagar to get ‘Jijau’ before Ganeshotsav
85
SHARES
242
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 20 : गणेशोत्सवापूर्वी गुहागर एसटी आगाराला १० जिजाऊ बस मिळणार असल्याची माहिती आगार व्यवस्थापनाने दिली. यामुळे ऐन गणेशोत्सवात अतिरिक्त फेऱ्या वाढविण्यास मदत होणार आहे. गुहागर आगाराला यापूर्वी लालपरी बस मिळाल्या होत्या. त्यामुळे लांब पल्ल्याच्या मार्गावर या बस सोडण्यास मदत झाली होती. Guhagar to get ‘Jijau’ before Ganeshotsav

आजपर्यंत आगाराला जुन्याच बसवर अवलंबून रहावे लागले आहे. ग्रामीण भागातही नेहमी वस्तीच्या बस सोडाव्या लागतात. त्यामुळे चांगल्या दर्जेदार बस आगाराकडे नाहीत. लांब पल्ल्याच्या काही महत्वाच्या बसही बंद करण्यात आल्या होत्या. मात्र, आता नव्या जिजाऊ बस मिळणार असल्याने बस सोडण्यास मदत होणार आहे. दरम्यान, गणेशोत्सवात जादा बसेस आगाराकडून सोडण्यात येतात. बाहेरील इतर आगारांमधून बस मागवाव्या लागतात. आगारात चालक, वाहक कमी आहेत. त्यामुळे त्यांच्यावर मोठा भार पडतो. काहींना डबल ड्युटी करावी लागते. त्यामुळे कामावर ताण येऊन वाहतूक सेवाही कोलमडते. त्यामुळे चालक, वाहकांची संख्या वाढविणे गरजेचे आहे. Guhagar to get ‘Jijau’ before Ganeshotsav

Tags: GuhagarGuhagar NewsGuhagar to get ‘Jijau’ before GaneshotsavLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share34SendTweet21
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.