खेलो इंडिया वुमन्स जुदो लीग स्पर्धा, रत्नागिरी द्वितीय तर पालशेत तृतीय
गुहागर, ता. 25 : भारतीय खेल प्राधिकरण व जुदो फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या मान्यतेने व महाराष्ट्र जुदो असोसिएशनच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर शहरात प्रथमच खेलो इंडिया वुमन्स जुदो लीग 2023 चे आयोजन रत्नागिरी जिल्हा हौशी जुदो संघटनेच्या वतीने करण्यात आले. या स्पर्धेत रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 8 संघांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेतील सांघिक अजिंक्यपद गुहागरच्या संघाने मिळवले. द्वितीय क्रमांक रत्नागिरी संघाने तर तृतीय पालशेत संघाने मिळवला. Guhagar team won the Judo League

स्पर्धेचे उद्घाटन शिव छत्रपती पुरस्कार विजेते आंतरराष्ट्रीय मल्लखांबपटू श्री शांताराम जोशी यांनी श्रीफळ वाढवून केले, या उद्घाटन समारंभाला लायन्स क्लब ऑफ गुहागर सिटीचे अध्यक्ष संतोषी वरंडे, लायन्स क्लॅबचे माधव ओक, संतोष मोरे, सचिन मुसळे, विजय सावंत, शिवतेज फाउंडेशनचे अध्यक्ष ॲड. संकेत साळवी, डॉक्टर निलेश ढेरे, पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोज बावधनकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक पवन कुमार कांबळे, रत्नागिरी जिल्हा तायक्यांदो असोसिएशनचे व्यंकटेशराव करा, भारतीय खेल प्राधिकरणचे अधिकारी भोलेनाथ पाल, महाराष्ट्र जुदो असोसिएशनचे विरधवल पाटोळे सर, गुहागर हायस्कूलचे मुख्याध्यापक सुधाकर कांबळे सर, रत्नागिरी जिल्हा जुदो संघटनेचे अध्यक्ष निलेश गोयथळे, खजिनदार सौ. सोनाली हळदणकर, गुहागर तालुका जुदो असोसिएशनच्या अध्यक्ष सोनाली वरंडे उपस्थित होत्या. Guhagar team won the Judo League

यशस्वी विद्यार्थ्यांना गुहागरच्या माजी नगराध्यक्ष सौ.स्नेहा वरंडे, मुख्याध्यापक श्री. सुधाकर कांबळे यांच्या हस्ते अनुक्रमे, सुवर्ण पदक, रौप्य पदक, कांस्य पदक आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेला पंच म्हणून समीर पवार, रुतिकेश झगडे, निलेश गोयथळे, संकेत सावंत, निहाल सुर्वे, सोनाली हळदणकर, वरद चव्हाण, पुष्कर कनगुटकर, यांनी काम पाहिले. Guhagar team won the Judo League
या स्पर्धेचा सविस्तर निकाल पुढीलप्रमाणे.
सब ज्युनिअर गट (28 कीलो) सुवर्णपदक लावण्या इंदुलकर (रत्नागिरी), रौप्य पदक गार्गी ओंनकर, कांस्यपदक भूमी मांडवकर (पालशेत) व निधी गुरव (हेदवी), (32 कीलो) सुवर्णपदक अन्वी शिंदे (रत्नागिरी), रौप्य पदक श्रद्धा रांगळे(हेदवी), कांस्य पदक फातिमा सय्यद (अंजनवेल) व मारिया आचरेकर (अंजनवेल) (36 की) सुवर्णपदक कृष्णाई रावराणे (सिंधूदुर्ग), रौप्य पदक मैथिली तावडे (गुहागर), कांस्य पदक साक्षी शिर्के (गुहागर) व रिया भुते (हेदवी), (40 की) सुवर्णपदक पायल चव्हाण (गुहागर), रौप्य पदक सांगवी मोरे (गुहागर) व सानवी चिपळूणकर , कांस्यपदक अक्षरा जेडगे (गुहागर), (44 की) सुवर्णपदक निरजा निमकर (गुहागर), रौप्य पदक श्रावणी वाडेकर (रत्नागिरी), कांस्य पदक भूमिका जोशी (रत्नागिरी) व उत्तरा कदम (रत्नागिरी) (48 की) सुवर्णपदक शर्वरी बारटक्के (गुहागर), रौप्य पदक त्रिशा मुरकर (रत्नागिरी), कांस्यपदक साक्षी राठोड (शृंगारतळी), (52 की) सुवर्णपदक -शमिका जागकर (पालशेत) आणि 52 की. पेक्षा अधिक वजनी गटात सुवर्णपदक जानवी जाधव (गुहागर), रौप्य पदक किरण राठोड, कांस्य पदक अनुष्का भोसले (गुहागर) व अंशिका चौबे यांनी मिळवले. Guhagar team won the Judo League

कॅडेट गट (40 किलो) सुवर्णपदक पल्लवी शिऺदे (सिंधूदुर्ग), रौप्य पदक तन्वी पारकर (सिंधूदुर्ग) कांस्य पदक ऋतुजा कनगुटकर (गुहागर) व सरोज रावणंग (पालशेत) (44 किलो) सुवर्णपदक अर्चिता सुर्वे (गुहागर), रौप्य पदक कोमल जॉईल (सिंधूदुर्ग), कांस्य पदक निर्जला नाटेकर (गुहागर) व आदर्शा घाटगे(गुहागर), (48 किलो) सुवर्ण पदक समुद्री चव्हाण (गुहागर), रौप्य पदक वेदश्री धनावडे (गुहागर), कांस्य पदक पुनम पारदळे (हेदवी), (52 किलो) सुवर्ण पदक सुष्टी वेल्हाळ (हेदवी), रौप्य पदक श्रावणी नागे (गुहागर), कांस्य पदक सानिका सुर्वे(गुहागर)व ईशा बहुतुले (रत्नागिरी) ( 57 किलो) सुवर्ण पदक रोहा जाक्कर (गुहागर), ( 63 किलो) सुवर्ण पदक तन्वी पवार (सिंधूदुर्ग), रौप्य पदक सिध्दीका जोशी (रत्नागिरी), कांस्य पदक दिया मोहिते (रत्नागिरी) व पुर्वा चव्हाण (रत्नागिरी), (70 किलो) सुवर्ण पदक सानिका गोंधळी (पालशेत), 70 किलो पेक्षा अधिक वजनी गटात सुवर्ण पदक सायली जाधव (पालशेत) यांनी मिळवले. Guhagar team won the Judo League

ज्युनियर गट (48 किलो) वजनी गटातील स्पर्धा चुरशीची झाली. या गटात सुवर्णपदक कस्तुरी कीरोडकर दे (सिंधूदुर्ग),, रौप्य पदक प्रगती नागे (पालशेत), कांस्य पदक पुनम खडके (रत्नागिरी) व प्राची धनावडे (गुहागर), यांनी मिळवले. (52 ते 78 किलो) वजनी गटात प्रत्येकी एक खेळाडू होता. त्यामध्ये (52 किलो) श्रावणी नागे (गुहागर), (57 किलो) नेहा किल्लेकर, (70 किलो) निशा पावरी (गुहागर), (78 किलो) श्रद्धा चाळके (गुहागर), या खेळाडूंना सुवर्णपदक देण्यात आले. Guhagar team won the Judo League

(48 किलो) सुवर्णपदक श्रद्धा पारधी (गुहागर), रौप्य पदक संजना निवाते (गुहागर), कांस्यपदक कादंबरी जोगळेकर (हेदवी), (57 कीलो) सुवर्णपदक रुक्मिण लटपटे(गुहागर), (63 किलो) रौप्य पदक वैदही शिंदे (गुहागर), (70 किलो) सुवर्णपदक आर्या भारती (गुहागर), (78 किलो) सुवर्णपदक सोनाली वरांडे (गुहागर), व प्रांजल रहाटे (गुहागर), यांनी विजय संपादन केला. Guhagar team won the Judo League

