10 गणांपैकी ओबीसींसाठी 2 गण आरक्षित
गुहागर, ता. 28 : येथील पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये नागरिकांचा मागास प्रवर्गसाठी 2 गण आरक्षित करण्यात आले आहेत. यापैकी एक आरक्षण महिलेसाठी आहे. उर्वरित 8 गणांमधील 4 गण सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित करण्यात आले आहेत. (Guhagar Reservation)
गुहागरच्या पंचायत समिती सभागृहात रोजगार हमी योजनेच्या उपजिल्हाधिकारी सौ. अनुजा तळेकर (नियंत्रण अधिकारी) यांच्या उपस्थितीत पंचायत समिती गणांचे आरक्षण निश्चित करण्यात आले. 2011 च्या जनगणनेनुसार गुहागर तालुक्यात 1 लाख 15 हजार 910 लोकसंख्या आहे. त्यापैकी अनुसुचित जातीची लोकसंख्या 2 हजार 778 तर अनुसुचित जमातीची लोकसंख्या 355 आहे. त्यामुळे अनुसुचित जाती व जमातींकरीता आरक्षण काढण्यात आले नाही. उर्वरित लोकसंख्येच्या 27 टक्के ओबीसी आरक्षण असल्याने दोन पंचायत समिती गण नागरिकांचा मागास प्रवर्गसाठी आरक्षित करण्यात आले. यामध्ये 1 जागा महिलांसाठी आरक्षित करण्यात आली. उर्वरित 8 गणांमधील 4 जागा महिलांसाठी आरक्षित करण्यात आल्या. यावेळी निवडणुक आयोगाकडून मागील आरक्षणांचा तक्ता देण्यात आला होता. या तक्त्यानुसार यापूर्वी ज्या गणांमध्ये ना.मा.प्र. आरक्षण नव्हते अशा गणांच्या चिठ्ठ्या टाकून त्यातून नागरिकांचे मागास प्रवर्गसाठी दोन गण आरक्षित करण्यात आले. या दोन गणांमधील एक गण चिठ्ठी टाकून ना.मा.प्र. स्त्रीसाठी आरक्षित करण्यात आला. याच पध्दतीने सर्वसाधारण स्त्री साठी गणांची निवड करण्यात आली. Guhagar Reservation
गुहागर पंचायत समिती आरक्षण Guhagar Reservation
यामध्ये 62 शिर गण ना.मा.प्र. स्त्रीसाठी तर 56 असगोली गण ना.मा.प्र.साठी आरक्षित करण्यात आला. 58 शृंगारतळी, 59 मळण, 60 कोंडकारुळ, 61 वेळणेश्र्वर हे चार गण सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित करण्यात आले. तर उर्वरित 55 अंजनवेल, 57 तळवली, 63 पडवे, 64 पाचेरी सडा हे गण सर्वसाधारणसाठी आरक्षित झाले. Guhagar Reservation
पंचायत समिती गण व जिल्हा परिषद गटांतील ग्रामपंचायतींचा तपशील पहाण्यासाठी इथे क्लिक करा.
ही प्रक्रिया तहसीलदार प्रतिभा वराळे, गटविकास अधिकारी राऊत यांनी निवासी नायब तहसीलदार ए. एस. प्रभुदेसाई, निवडणूक सहाय्यक अधिकारी ए. एस. संख्ये, मंडळ अधिकारी एस. पी. गवळी, व्ही. एल. भोजने, पी. डी. हिवाळे, पी. एस. पालांडे, ए. डी. शिगवण, कोतवाल पंकज आग्रे, दिवाकर जोशी, अमित जोशी यांच्या मदतीने पूर्ण केली. Guhagar Reservation
यावेळी शिवसेना तालुकप्रमुख सचिन बाईत, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विनायक मुळे, समित घाणेकर, इंदिरा काँग्रसचे तालुकाप्रमुख रियाज ठाकूर, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष पद्माकर आरेकर, गौरव वेल्हाळ, रवींद्र आंबेकर, मनसे तालुकाध्यक्ष विनोद जानवलकर आदी उपस्थित होते. Guhagar Reservation