देवघरला सापडलेल्या मृतदेहाचे गुढ उकलले, गुहागर पोलीसांचे यश
गुहागर, ता. 06 : गुहागर तालुक्यातील देवघर गावातील नदीपात्रात सडलेल्या स्थितीत एक मृतदेह सापडला होता. या मृतदेहाच्या डोक्यावरील जखमा पाहून हा खून असल्याचे निष्पन्न झाले. पोलीसांनी त्या दिशेने तपासाला सुरवात केली. त्याचे धागे मयत व्यक्तीची पत्नी आणि प्रियकरापर्यंत पोचले. 5 मे रोजी पहाटे गुहागर पोलीसांनी खेड तालुक्यातील आंबडस परिसरातून प्रियकर आणि प्रेयसी यांना अटक केली. Guhagar police investigated the murder
या प्रकरणाचा घटनाक्रम असा की, 1 मे रोजी गुहागर तालुक्यातील देवघर येथील नदीपात्रात एका तरुणाचा मृतदेह सापडला. हा मृतदेह सडलेल्या अवस्थते होते. मृतदेहाच्या डोक्यावर पाठीमागून जोरदार फटका मारण्यात आला असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत होते. या फटक्यामुळे तरुणाच्या कवटीला जबरदस्त्त मार लागला होता. पोलीसांनी हा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवला.Guhagar police investigated the murder
ज्या पध्दतीने मृतदेहाला मार लागला होता त्यावरुन हा घातपाताचा प्रकार आहे हे गुहागरचे पोलीस निरीक्षक सचिन सावंत यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी त्या दिशेने तपासाला सुरवात केली. आणि खूनाचे धागेदोरे मार्गताम्हाने गोपाळवाडी पासून आंबडस (ता. खेड) गवळवाडीपर्यंत जावून पोचले. त्यातून पोलीसांनी बुधवारी 5 मे रोजी पहाटे प्रियकर आणि प्रेयसीला ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केल्यावर प्रेयसीने प्रियकराच्या साथीने आपल्या पतीचा काटा काढल्याचे समोर आले.
Guhagar police investigated the murder
सदर मृतदेह हा खेड तालुक्यातील आंबडस गवळवाडी येथील गणेश शिवराम माने या तरुणाचा होता. मार्गताम्हाने गोपाळवाडीतील जयश्री माने (वय 37) (सासरचे नाव) याच्याबरोबर गणेशचा विवाह झाला आणि ती आंबडसला राहु लागली. आंबडस गवळवाडी रहाणारा प्रदिप सिताराम कदम (वय 42) याचा वडापावचा व्यवसाय होता. त्याचा घटस्फोट झाला होता. लॉकडाऊनच्या काळात जयश्रीचे आणि प्रदिप सिताराम कदम (वय 42) यांचे प्रेमसंबंध जुळून आले होते. याची कुणकुण सात ते आठ महिन्यांपूर्वी गणेश मानेला लागली. त्यातून गणेश आणि जयश्रीत वादावादी होऊ लागली. काही वेळा गणेश जयश्रीला मारहाणही करत असे. याच वादातून जयश्री चार महिन्यांपूर्वी आपल्या माहेरी मार्गताम्हाने गोपाळवाडी येथे रहाण्यास आली. आता गणेशचा अडथळा दूर करण्याचे जयश्री आणि प्रदिप यांनी ठरविले. जयश्रीने गणेशला मार्गताम्हाने येथे बोलावून घेतले. त्यानंतर दोघे देवघरला फिरण्यासाठी गेले. तेथील आडवाटेला नदीपात्रा शेजारी प्रदिप थांबला होता. तेथेच गणेशला जीवे मारहाण करण्यात आली. गणेशचा मृत्यू झाल्याची खात्री पटल्यावर दोघांनी गणेशचा मृतदेह नदीपात्रात टाकून पोबारा केला.
मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी बेपत्ता झालेल्या व्यक्तीचा शोध पोलीस घेवू लागले त्यातून आंबडसचा गणेश माने बेपत्ता असल्याचे कळले. तपासामध्ये त्याची पत्नी मार्गताम्हाने गोपाळवाडीत रहात असल्याचे समजले. मग वेगवेगळ्या पध्दतीने पोलीसांनी चौकशी, तपास सुरु केला. त्यातून या खुनाची उकल अवघ्या तीन दिवसांत गुहागरचे पोलीस निरीक्षक सचिन सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली गुहागरच्या पोलीसांनी केली.Guhagar police investigated the murder