चिखली येथे 24 वी रत्नागिरी जिल्हा अजिंक्यपद जुदो स्पर्धा संपन्न
गुहागर, ता. 23 : रत्नागिरी जिल्हा जुदो संघटनेच्या वतीने नुकतीच ओंकार सभागृह चिखली येथे 24 वी रत्नागिरी जिल्हा अजिंक्यपद जुदो स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचे विजेतेपद गुहागर जुदो क्लब, द्वितीय विजेतेपद जुदोका फायटर शृंगारतळी व तृतीय विजेतेपद आबलोली जुदो क्लब ने पटकाविले. Guhagar Judo Club Wins Championship

या स्पर्धेच्या बक्षिस वितरण समारंभाला आय पी एस फत्तेसिंह पाटिल, ओंकार संसारे, रिद्धी संसारे, ललित चितळे, अभय चितळे, स्ई महाडीक, निलेश गोयथळे, स्वप्निल चव्हाण, बाबासाहेब राशिनकर, वैभव पवार, हेमंत शिरकर, समिर साळवी, श्री गांधी, सुधाकर कांबळे, सोनाली वरंडे, समिर पवार, अर्चिता सुर्वे, तपस्विनी नाटेकर उपस्थित होते. Guhagar Judo Club Wins Championship
