घरे, संरक्षक भिंती कोसळण्याच्या घटना
गुहागर, ता. 20 : तालुक्यात गेल्या दिवसांपासून धो धो कोसळणाऱ्या पावसाचा मोठा फटका बसला आहे. अनेक ठिकाणी घरे, गोठे, झाडे, संरक्षक भिंती कोसळण्याच्या घटना घडल्या. काही मार्गावर कोसळलेली दरड प्रशासन आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे लगेच बाजूला करण्यात आली. अनेक ठिकाणची भातशेती पाण्याखाली गेली आहे. Guhagar is hit hard by torrential rains

सतत धो धो कोसळणाऱ्या पावसाने तालुका वासियांना चांगलेच झोडपून काढले आहे. मुसळधार पावसामुळे मौजे जांभारी येथील श्रीम. दर्शना विजय सुर्वे यांच्या घराचे अंशतः नुकसान झाले आहे. बंदरवाडी येथील संतोष नाटेकर यांच्या घराजवळील बांध कोसळून नुकसान झाले आहे. पोमेंडी, गोणवली मुख्य रस्ता ठिकाणी झाड पडले होते. ग्रामस्थांच्या मदतीने रस्ता मोकळा करण्यात आला आहे. कोतळूक शिगवणवाडी येथील प्रकाश दत्ताराम शिगवण यांचा गोठा कोसळला असून कोणतीही जिवितहानी नाही. पेवे येथील अ रज्जाक हसन पेवेकर यांच्या घराचे अंशत: नुकसान झाले आहे. वेलदुर घरातवाडी, जावडेवाडी संभाव्य कोसळणाऱ्या भागाची प्रशासनाकडून पाहणी करण्यात आली आहे. वेळणेश्वर खारवीवाडी अलीकडे जोडणाऱ्या जिल्हा परिषदेच्या साकवच्या पायऱ्या काल पासून सुरू असलेल्या अतिवृष्टीने खचल्या आहेत. त्यामुळे साकव रहदारीसाठी बंद करण्यात आला आहे. पाटपन्हाळे येथील मालती महिपत चव्हाण यांच्या राहत्या घराच्या दोन भिंती पडून नुकसान झाले आहे. यात कोणालाही दुखापत झालेली नाही. आबलोली येथील अंगणवाडी बोध्दवाडी, समाज मंदीरच्या इमारतीचे पावसामुळे नुकसान झाले आहे. Guhagar is hit hard by torrential rains

वरवेली हसलाई देवी मंदिर येथील प्रवासी पिकप शेड पावसामुळे संपूर्ण जमीनदोस्त झाली आहे. यावेळी कोणीही प्रवासी या शेड मध्ये नसल्याने मोठा अनर्थ टाळला आहे. कोळवली, गवाणवाडी येथील पाण्याच्या टाकीवर काल झालेल्या पावसामुळे दरड कोसळली आहे. तसेच आसपासची झाडे टाकीवर कोसळली आहेत. दरड आणि झाडे बाजूला करण्याचे कामं सुरु होते. आरे पिंपळवट वाकी मार्गे पाटपान्हाळे जाणाऱ्या रस्त्यावर झाड पडून पुर्ण रस्ता बंद झाला होता. वाकी गावातील ग्रामस्थांनी पडलेले झाड रस्त्यावरून बाजूला केले आणि रस्ता वाहतुकीसाठी मोकळा केला आहे. जामसूद येथील दिपाली दिपक साळवी यांचे घरावर झाड पडले असून पत्र्याचे नुकसान झाले आहे. ग्रामपंचायत साखरी आगर येथील शशीकांत नाचरे यांच्या घरा लगतची संरक्षण भिंत अतिवृष्टीने कोसळली आहे. तसेच तालुक्यात मंगळवारी अनेक ठिकाणी अतिवृष्टीमुळे नुकसानीच्या घटना घडल्या आहेत. Guhagar is hit hard by torrential rains