• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
6 July 2026, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

गुहागर जिमखाना वतीने कॅनरा बँक कर्मचाऱ्यांचा सन्मान

by Mayuresh Patnakar
June 11, 2026
in Guhagar, Old News
125 1
0
Guhagar Gymkhana honours Canara Bank employees
246
SHARES
702
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 11 : गेल्या दोन वर्षांमध्ये शहरातील इतर बँकांच्या तुलनेत विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्ज, घर दुरुस्ती कर्ज तसेच विविध शासकीय व बँक योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी कॅनरा बँकेच्या कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. ग्राहकांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी अनेकदा आपल्या निश्चित कामकाजाच्या वेळेपेक्षा अधिक वेळ काम करत सेवा दिली. विशेष म्हणजे, बहुतांश कर्मचारी स्थानिक नसतानाही त्यांनी स्थानिक नागरिकांच्या गरजा समजून घेत त्यांना सर्वोत्तम सेवा देण्याचे कार्य केले. या उल्लेखनीय कार्याची दखल घेत गुहागर जिमखाना वतीने बँक व्यवस्थापक श्री. आशुतोष नरवरिया तसेच श्री. विनायक शिमगे, श्री. सुहास करजकर आणि श्री. गणेश जाधव यांचा सन्मान करण्यात आला. Guhagar Gymkhana honours Canara Bank employees

यावेळी जिमखाना अध्यक्ष श्री. निलेश म. मोरे, श्री. संगम मोरे, श्री. राकेश साखरकर आणि श्री. राजेंद्र बागकर उपस्थित होते. या उपक्रमामुळे बँक कर्मचारी व ग्राहक यांच्यातील विश्वासाचे नाते अधिक दृढ होण्यास मदत होणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. Guhagar Gymkhana honours Canara Bank employees

Tags: GuhagarGuhagar Gymkhana honours Canara Bank employeesGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share98SendTweet62
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.