नगराध्यक्षांकडे केला सुपूर्त, आघाडीच्या पदाधिकाऱ्याचा दुजोरा
गुहागर, ता. 30 : विषय समित्यांच्या निवडणुकीपूर्वी गुहागर नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षा सौ. स्नेहा भागडे यांनी उपनगराध्यक्ष पदाचा राजीनामा नगराध्यक्ष राजेश बेंडल यांच्याकडे सुपूर्त केला आहे. नगरपंचायतीच्या उर्वरित कालावधीत दुसऱ्यांना संधी मिळावी यासाठी राजीनामा देत असल्याची माहिती सौ. स्नेहा भागडे यांनीच गुहागर न्यूजला दिली. शहर विकास आघाडीच्या एका पदाधिकाऱ्यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. I resign from Guhagar Nagar Panchayat Deputy Mayor to Give Oppurtunity to Other corporators Said Deputy Mayor Mrs. Bhagade.
खळबळजनक : भाजप सत्तेतून बाहेर पडणार
सौ. भागडे म्हणाल्या की, 2018 मध्ये शहर विकास आघाडी सत्तेत येण्यापूर्वी मी गुहागर नगरपंचायतीची नगराध्यक्ष म्हणून काही काळ काम पाहिले. गेली 3 वर्ष उपनगराध्यक्ष म्हणून कार्यरत होते. आता दुसऱ्यांना ही संधी मिळाली पाहिजे. नगरपंचायतीमध्ये नगरसेवक असल्यापासून माझ्या प्रभागातील विकास कामे करण्यावर मी भर देत आले आहे. त्याचबरोबर उपनगराध्यक्ष म्हणून शहरातील सर्व जनतेसाठी काम केले. माझ्याकडे काम घेवून आलेल्या प्रत्येक नागरिकाला माझ्यापरीने सर्वोतोपरी सहकार्य केले.
कै. बेंडल गुरुजी हे माझे गुरु असून त्यांनी दिलेल्या शिकवणीप्रमाणे मी शहरात काम केले. शहर विकास आघाडीची स्थापना होण्यापूर्वीपासून मी राजकारणात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची (Nationalist Congress Party)सक्रिय कार्यकर्ती आहे. या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी महिनाभरापूर्वी माझ्याकडे तालुक्याचे पद देण्याविषयी चर्चा केली होती. या चर्चेनंतर मी माझ्या समाज संघटनेतील स्थानिक आणि मुंबई शाखेच्या पदाधिकाऱ्यांजवळ चर्चा केली. तसेच शहर विकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांजवळही बोलले. सर्वांनी मला हे पद घेण्यास पाठींबा दर्शविला. सर्वांच्या अनुमतीनंतर मी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना होकार कळविला होता. त्याप्रमाणे खासदार सुनील तटकरेंच्या उपस्थित गुहागरमध्ये 24 सप्टेंबरला झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आढावा बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) गुहागर तालुका महिला अध्यक्ष अशी नेमणूक करण्यात आली. त्याचे नियुक्ती पत्र खासदार सुनील तटकरेंच्या (MP Sunil Tatkare) हस्ते मला देण्यात आले. आता तालुक्यात महिला संघटन वाढविण्याचे काम पक्षाने माझ्यावर सोपविले आहे. त्यासाठी गुहागर तालुक्यात प्रवास करावा लागेल. या सर्व गोष्टींचा विचार करुन उपनगराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. यानंतरही नगरसेविका म्हणून मी कार्यरत रहाणार आहे.
गुहागर तालुक्याला अभिमान वाटावा अशी बातमी :
महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालयाचा दिल्लीत गौरव
सौ. स्नेहा भागडे यांच्या राजीनाम्याबाबत शहर विकास आघाडीच्या एका पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, सौ. भागडे यांनी नगराध्यक्षांकडे राजीनामा दिला ही वस्तुस्थिती आहे. मात्र हा राजीनामा मंजूर करण्याचे अधिकार मा. जिल्हाधिकाऱ्यांना (District Collector) असतात. राजीनामा देण्यापूर्वी त्यांनी शहर विकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना विश्र्वासात घेतले होते. त्यांचा राजीनामा देण्याचा दृष्टीकोन कौतुकास्पद आहे. त्यामुळे त्यांच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो.