गुहागर, ता. 30 : गुहागर तालुका भारतीय जनता पक्षाच्या तालुकाध्यक्ष पदी पुन्हा एकदा डॅशिंग नेतृत्व करणारे तवसाळ येथील श्री. निलेश सुर्वे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्ष संघटन वाढीसाठी दिलेल्या योगदानाची दखल घेत पक्षाने त्यांना पुन्हा एकदा तालुकाध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी दिली आहे. तालुकाध्यक्ष पदी दुसऱ्यांदा निवड झाल्याबद्दल सर्वस्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे. Guhagar BJP Taluka President Nilesh Surve
भारतीय जनता पार्टीच्या पक्ष घटनेनुसार दर तीन वर्षांनी राष्ट्रीय स्तरापासून ते मंडल स्तरापर्यंत पदाधिकारी नियुक्ती केली जाते. याच पार्श्वभूमीवर दि. २७ रोजी उत्तर रत्नागिरी जिल्ह्यामधील मंडळ अध्यक्ष म्हणजेच तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष तसेच काही जिल्हा पदाधिकाऱ्यांची नियुक्ती प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर करण्यात आल्या. यामध्ये गुहागर तालुकाध्यक्षपदी निलेश सुर्वे यांची दुसऱ्यांदा निवड करण्यात आली आहे. Guhagar BJP Taluka President Nilesh Surve
सर्वसामान्य कुटुंबातील असलेले श्री. सुर्वे हे सर्वसामान्य कार्यकर्ता ते भाजप तालुकाध्यक्ष पद असा प्रवास केला आहे. सुरुवातीला पर्यटन व्यवसाय आणि पत्रकारिता केली. त्यानंतर राजकारणात सक्रिय सहभाग घेतला. गुहागर तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये आलेली मरगळ दूर करण्यासाठी वरिष्ठांनी तालुकाध्यक्ष पदाची जबाबदारी निलेश सुर्वे यांच्यावर सोपवली होती. तालुकाध्यक्ष पदाच्या कालावधीत पक्ष संघटनेबरोबरच विरोधकांनाही जसेच्या तसे उत्तर देण्याचे काम केले आहे. तालुक्यातील विविध विषयांवर आवाज उठवून नागरिकांना न्याय मिळवून दिला आहे. एक डॅशिंग नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. Guhagar BJP Taluka President Nilesh Surve