• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
21 December 2025, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

महाराष्ट्रात गुहागरचा समुद्रकिनारा सर्वात सुंदर

by Guhagar News
December 15, 2025
in Guhagar
430 4
9
Guhagar beach is the most beautiful.
844
SHARES
2.4k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

दीपक विचारे, नरेश पेडणेकर: वाळू शिल्प प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद 

गुहागर, ता. 15 : ब्ल्यू फ्लॅग मानांकन पायलट प्रकल्प म्हणून आपल्या गुहागर साठी मंजूर झाला आहे. महाराष्ट्रामध्ये सर्वात सुंदर समुद्र किनारा म्हणून गुहागरची ओळख आहे. आपल्या सर्वांच्या सहकार्याने गुहागरला आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटन पातळीवर न्यायचे आहे. असे प्रतिपादन ब्लू फ्लॅग मानांकन पायलट प्रकल्प सहाय्यक दीपक विचारे, नरेश पेडणेकर यांनी केले. Guhagar beach is the most beautiful

ब्लू फ्लॅग मानांकन पायलट प्रकल्पाला अंतिम मानांकनासाठी गुहागर समुद्रकिनाऱ्यावर विविध उपक्रम राबवण्यास सुरुवात झाली असून यातील वाळू शिल्प प्रदर्शन या उपक्रमाला यशस्वीपणे सुरुवात झाली. मुख्याधिकारी स्वप्निल चव्हाण यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून तर दीपक विचारे यांच्या हस्ते फीत कापून वाळू शिल्प प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. Guhagar beach is the most beautiful.

Guhagar beach is the most beautiful.

वाळू शिल्प प्रदर्शनामध्ये अष्टवणे श्री गणेश मंदिर ची प्रतिकृती साकारली आहे तर भगवान महादेव यांची प्रतिकृती, गुहागरचे डॉल्फिन प्रदर्शन, कोकण संस्कृती, आधी वाळू शिल्प कलाकृती पहावयास मिळत आहेत. यावेळी गुहागर समुद्रकिनारी पर्यटकांच्या जिभेचे चोचले पुरवणारे भेळपुरी सेंटर, जेवण व विविध कोकणी पदार्थ विक्री करणारे छोट्या व्यावसायिकांना डसबीन वितरित करण्यात आले. Guhagar beach is the most beautiful.

यावेळी तहसीलदार परीक्षित पाटील, मुख्याधिकारी स्वप्निल चव्हाण, दीपक विचारे, नरेश पेडणेकर, गटविकास अधिकारी शेखर भिलारे, एडवोकेट संकेत साळवी आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थित तहसीलदार परीक्षित पाटील, दीपक विचारे, नरेश पेडणेकर, मुख्याधिकारी स्वप्निल चव्हाण यांनी मार्गदर्शन करताना गुहागर समुद्रकिनाऱ्यावर कोणीही उघड्यावर प्लास्टिक अथवा कचरा टाकू नये. यावर कडक निर्बंध यापुढे लावले जाणार आहेत. प्लास्टिक फ्री तसेच प्लास्टिक टाकणाऱ्यांना दंड यासारखी अंमलबजावणी केली जाणार आहे. आपण व्यावसायिकांनी स्वतः स्वच्छतेबरोबर येणाऱ्या सर्व पर्यटकांना व स्थानिक जनतेलाही कचरा उघड्यवर टाकू नये. याची सूचना करावयाची आहे. Guhagar beach is the most beautiful.

ब्लू फ्लॅग मानांकनासाठी गुहागर हे सर्वोत्तम निवडीचे ठिकाण आहे. यामुळे या पर्यटनातून आपल्या सर्वांचा विकास होणार आहे. दर पंधरा दिवसांनी येथील समुद्राचे पाण्याची तसेच हवेची प्रदूषण नियंत्रक मंडळाच्या वतीने तपासणी केली जात आहे आपल्याला आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटन द्यावयाचे आहे यासाठी हे एक संधी निर्माण झाले आहे. छोट्या मोठ्या व्यवसायिकांचे व्यवसाय मध्ये वाढ होणार आहे. यामुळे आपण सर्वांनी मिळून एकत्र येऊन हे ब्लू फ्लॅग मानांकनाच्या पायलट प्रकल्पाला अंतिम मंजुरीपर्यंत नेण्याकरिता सहकार्य करावे. मार्च व एप्रिलमध्ये या प्रकल्पाची डेन्मार्क वरून येणाऱ्या कमिटी कडून तपासणी केली जाणार आहे असेही शेवटी बोलताना सांगितले. Guhagar beach is the most beautiful.

Tags: GuhagarGuhagar beach is the most beautiful.Guhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share338SendTweet211
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.