पालकमंत्री उदय सामंत यांचे गुहागरवासियांना आश्वासन
गुहागर, ता. 16 : गुहागर समुद्रकिनाऱ्याला आंतरराष्ट्रीय ब्ल्यू फ्लॅग दर्जा मिळाला त्याबद्दल महाराष्ट्र शासन यांचे प्रतिनिधी या नात्याने राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी पालकमंत्री उदय सामंत यांची भेट घेऊन गुहागर नगरपंचायती मधील शिवसेना नगरसेवकांच्या वतीने आभार मानण्यात आले. यावेळी गुहागर शहराच्या पर्यटन आणि सर्वांगीण विकासासाठी भरघोस निधी उपलब्ध करून देऊ, असे आश्वासन ना. सामंत यांनी दिले. Guhagar beach gets Blue Flag status
यावेळी उपनगराध्यक्ष प्रदीप बेंडल, गटनेता अमोल गोयथळे, स्वच्छता सभापती सुजित साटले, महिला बालकल्याण सभापती सौ.विदिशा दणदणे, नगरसेवक संदेश उदेक, नगरसेविका स्वरा तेलगडे आदी उपस्थित होते. Guhagar beach gets Blue Flag status
